Pranali Kodre
अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू लिओनल मेस्सी नुकताच 'GOAT इंडिया टूर २०२५' अंतर्गत भारत दौऱ्यावर आला होता. भारतातील फुटबॉलला चालना देण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला होता.
Leonel Messi Handshake and Photo price
Sakal
त्याने लुईस सुवारेज आणि रोड्रिगो डी पॉल या फुटबॉलपटूंसह १३ ते १५ डिसेंबर दरम्यान भारतातील वेगवेगळ्या शहरांना भेट दिली.
Leonel Messi Handshake and Photo price
Sakal
मेस्सीने कोलकाता, हैदराबाद, मुंबई आणि दिल्ली या शहरांना तीन दिवसांच्या कालावधीत भेट दिली.
Leonel Messi Handshake and Photo price
Sakal
यावेळी चारही शहरांमध्ये मोठे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमांदरम्यान खेळाडू, राजकारण्यांसह अनेक सेलिब्रेटीही उपस्थित होते.
Leonel Messi Handshake and Photo price
Sakal
या कार्यक्रमांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले होते, तसेच चाहत्यांनीही मेस्सीची एक झलक पाहाण्यासाठी हजारो रुपयांची तिकीटे खरेदी केली होती.
Leonel Messi Handshake and Photo price
Sakal
दरम्यान, मीडिया रिपोर्ट्सनुसार काही VIP आणि कॉर्पोरेट पाहुण्यांसाठी बंद दाराआड 'मीट अँड ग्रीट' कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते.
Leonel Messi Handshake and Photo price
Sakal
यावेळी मेस्सीच्या खास भेटीसाठी आणि हस्तांदोलनाची किंमत १ कोटी रुपये असल्याचे रिपोर्ट्स समोर आले आहेत.
Leonel Messi Handshake and Photo price
Sakal
इतकेच नाही, तर मेस्सीसोबतच्या एका फोटोसाठी जीएसटीसह ९.९५ लाख रुपये किंमत आकारण्यात आली. त्यासाठीही काही ठराविक स्लॉटच उपलब्ध होते.
Leonel Messi Handshake and Photo price
Sakal
टीप: दरम्यान, या किंमतीबाबतची माहिती अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार देण्यात आली आहे. याबाबत आयोजकांकडून अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.
Leonel Messi Handshake and Photo price
Sakal
IPL 2026 Auction
Sakal