मोर की लांडोर? दोघांमध्ये नेमका फरक काय? शेपटीपासून रंगापर्यंत जाणून घ्या ‘हे’ खास फरक

Varsha Balhe

मोर आणि लांडोर यात फरक काय?

मोर आणि लांडोर दिसायला वेगळे असले, तरी दोघेही एकाच प्रजातीचे पक्षी आहेत. मोर हा नर, तर लांडोर ही मादी. मग दोघांना ओळखायचं कसं? चला, सोप्या भाषेत पाहूया.

PEACOCK VS PEAHEN DIFFERENCE

|

esakal

पिसारा

मोराचा सगळ्यात मोठा फरक म्हणजे त्याचा सुंदर पिसारा. तो पिसारा फुलवून नाचतो. त्यावर डोळ्यांसारखी गोल नक्षीही दिसते. लांडोरीकडे असा मोठा आणि रंगीबेरंगी पिसारा नसतो.

PEACOCK VS PEAHEN DIFFERENCE

|

esakal

रंग

मोराचा गळा आणि छाती निळ्या-हिरव्या रंगाची चमकदार दिसते. त्यामुळे तो लांबूनही लगेच ओळखू येतो. लांडोरीचा रंग मात्र तपकिरी, करडा आणि फिकट असतो. त्यामुळे ती आजूबाजूच्या वातावरणात सहज मिसळते.

PEACOCK VS PEAHEN DIFFERENCE

|

esakal

आकार

साधारणपणे मोर लांडोरीपेक्षा मोठा असतो. त्याचं शरीरही जास्त भरदार दिसतं. लांडोर आकाराने थोडी लहान असते.

PEACOCK VS PEAHEN DIFFERENCE

|

esakal

डोक्यावरचा तुरा

मोर आणि लांडोर दोघांच्याही डोक्यावर तुरा असतो. पण मोराचा तुरा जास्त उठून दिसतो. लांडोरीचा तुरा तुलनेने साधा दिसतो.

PEACOCK VS PEAHEN DIFFERENCE

|

esakal

नाचतो

मोर पिसारा फुलवून नाचतो, हे तर सगळ्यांनी पाहिलंय. पण तो असाच उगाच नाचत नाही. मादीला आकर्षित करण्यासाठी तो असा पिसारा फुलवतो.

PEACOCK VS PEAHEN DIFFERENCE

|

esakal

लांडोर

लांडोर अंडी घालते आणि ती उबवते. पिल्लांची काळजी घेण्यातही तिची महत्त्वाची भूमिका असते.

PEACOCK VS PEAHEN DIFFERENCE

|

esakal

मग ओळखायचं कसं?

तर हे देखील सोप आहे, मोठा रंगीबेरंगी पिसारा आणि चमकदार निळा गळा दिसला, तर तो मोर. साधा तपकिरी-करडा रंग आणि मोठा पिसारा नसलेली मादी दिसली, तर ती लांडोर.

PEACOCK VS PEAHEN DIFFERENCE

|

esakal

सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायल्याने होतात हे 8 फायदे

Warm Water Benefits

|

esakal

येथे क्लिक करा