संतोष कानडे
मुघल बादशहांच्या एकापेक्षा जास्त विवाह करण्याच्या आणि हरममध्ये शेकडो उपपत्नी ठेवण्याच्या सवयीमुळे महिलांना फार त्रास सहन करावा लागे.
राजघराण्यातील राजकन्या किंवा महिलांचा विवाह कोणाशी करायचा, याचा निर्णय त्यांच्या इच्छेविरुद्ध केवळ राजकीय युती आणि फायद्यासाठी बादशहा स्वतः घेत असत.
बादशहांच्या कडक पडदा पद्धतीमुळे महिलांना चार भिंतींच्या बाहेर पडण्यास बंदी होती. हरममधील महिलांच्या प्रत्येक हालचालीवर गुप्तहेर आणि पहारेकऱ्यांमार्फत २४ तास पाळत ठेवली जात असे.
काही मोजक्या राण्या वगळता इतर महिलांना स्वतःचे आर्थिक व्यवहार स्वतंत्रपणे करण्याची परवानगी नव्हती.
बाहेर कुठेही प्रवासाला जाण्यासाठी बादशहाची परवानगी आणि पूर्ण बंद पालखीचा वापर बंधनकारक होता.
बादशहाच्या मर्जीनुसारच महिलांचे हरममधील स्थान आणि खर्च ठरवला जात असे. त्यामुळे महिलांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागे.
विशेष बाब म्हणजे हरममध्ये आजारी पडलेल्या महिलांना थेट वैद्यांसमोर जाण्याची मुभा नव्हती, त्यांना पडद्याआडूनच उपचार घ्यावे लागत.
आपल्या मुलाला गादीवर बसवण्यासाठी मातांना अंतर्गत राजकारणाचा आणि मानसिक तणावाचा सामना करावा लागे.
महिलांच्या दैनंदिन दिनचर्येपासून त्यांच्या सेवेतील दासींपर्यंतचे सर्व निर्णय बादशहाच्या नियमांनुसारच चालत असत. बादशहाच्या मर्जीशिवाय काहीही होत नसे.
Mongoose snake fight truth
esakal