सकाळ डिजिटल टीम
बेल फळ आरोग्यासाठी जीतके फायदेशीर मानले जाते तितकेच ते आरोग्यासाठी घातक देखील ठरु शकते.
बेल फळाचे कोणते दुष्परिणाम आहेत जाणून घ्या.
बेल फळात रेचक गुणधर्म असतात, त्यामुळे जास्त सेवन केल्यास बद्धकोष्ठता होऊ शकते.
बेल फळाचे जास्त सेवन केल्याने पोटाशी संबंधित समस्या, जसे की अपचन, पोटदुखी होऊ शकते.
बेल फळामध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे किडनी स्टोनची समस्या वाढू शकते.
बेल फळ रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करते, परंतु ते जास्त प्रमाणात घेतल्यास रक्तातील साखरेची पातळी कमी होऊन समस्या वाढू शकतात.
काही लोकांना बेलाच्या फळाचा त्वचेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
गर्भवती किंवा स्तनपान करवणाऱ्या महिलांनी बेल फळ खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा
बेल फळ खाताना योग्य प्रमाणात सेवन करणे आवश्यक आहे.