गुलाल कसा तयार होतो?

सकाळ डिजिटल टीम

गुलाल

तुम्ही वापरत असतलेला गुलाल कसा तयार होतो जाणून घ्या माहीती?

gulal making process

|

sakal 

मुख्य आधार

गुलाल तयार करण्यासाठी प्रामुख्याने टॅल्कम पावडर (Talcum Powder) किंवा अरारोट पावडर (Arrowroot) तसेच मका पिठाचा (Corn Starch) वापर आधार म्हणून केला जातो. यामुळे गुलाल मऊ आणि हलका होतो.

gulal making process

|

sakal 

रंग मिश्रण

पांढऱ्या रंगाच्या बेस पावडरमध्ये विविध रंग मिसळले जातात. नैसर्गिक गुलालासाठी भाज्यांचा अर्क (उदा. बीट, हळद) वापरतात, तर व्यावसायिक स्तरावर 'सिंथेटिक डाय' किंवा 'फूड ग्रेड कलर्स' वापरले जातात.

gulal making process

|

sakal 

सुगंधाचा वापर

गुलालाला विशिष्ट ओळख मिळवून देण्यासाठी त्यात सुगंधी द्रव्ये (Perfumes) किंवा नैसर्गिक अर्क (उदा. गुलाब, चंदन किंवा वाळा) मिसळले जातात.

gulal making process

|

sakal 

ओली प्रक्रिया

पावडर, रंग आणि पाणी यांचे मिश्रण करून एक घट्ट लगदा तयार केला जातो. यामुळे रंग पावडरच्या कणांना व्यवस्थित चिकटतो.

gulal making process

|

sakal 

सुकवण्याची पद्धत

तयार झालेला ओला लगदा मोठ्या ट्रेमध्ये पसरवून उन्हात किंवा हॉट एअर ओव्हनमध्ये पूर्णपणे सुकवला जातो.

gulal making process

|

sakal 

दळणे किंवा ग्राईंडिंग

सुकलेला लगदा कडक होतो, त्यामुळे तो पुन्हा यंत्राच्या साहाय्याने अतिशय बारीक दळला जातो. यामुळे आपल्याला हवी तशी मऊ पावडर मिळते.

gulal making process

|

sakal 

नैसर्गिक गुलाल

सध्या रासायनिक गुलालाला पर्याय म्हणून पळसाची फुले, वाळलेली झेंडूची फुले किंवा कडुनिंबाची पाने वाळवून त्यांची पावडर करून त्यात नैसर्गिक सुगंध मिसळून हर्बल गुलाल तयार केला जातो.

gulal making process

|

sakal 

पॅकेजिंग

तयार झालेला गुलाल हवेचा संपर्क टाळण्यासाठी प्लॅस्टिक पिशव्या किंवा बॉक्समध्ये पॅक केला जातो, जेणेकरून त्याचा सुगंध आणि रंग दीर्घकाळ टिकून राहील.

gulal making process

|

sakal 

ख्रिसमसला घरच्या घरी बनवा बेकरी स्टाईल प्लम केक

येथे क्लिक करा