सकाळ डिजिटल टीम
अनेक वेळा घाई गडबडीत आपण केस धुतो मात्र ते स्वच्छ न झाल्याने केसांंना खाज येणे, कोंडा या सारख्या समस्या होण्याची शक्यता असते.
केस धुण्याची योग्य पद्धत कोणती आहे जाणून घ्या सविस्तर माहीती.
केस धुण्यासाठी सामान्य तापमानाचे पाणी वापरवे. खूप गरम पाणी केसांवर टाळल्यास केसांची मुळे खराब होण्याची शक्यता कमी होते.
शॅम्पू लावताना टाळूला हलक्या हाताने मसाज करा, जेणेकरून शॅम्पू व्यवस्थितरित्या लावता येईल आणि टाळू स्वच्छ होईल.
शॅम्पू केल्यानंतर केसांना कंडिशनर लावल्यास केस मऊ आणि चमकदार राहतात. नियमित कंडिशनरचा वापर केल्याने केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
केस धुतल्यानंतर, ते टॉवेलने किंवा हवेत सुकवू घ्यावे. केस सुकवण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर टाळा, कारण यामुळे केस खराब होऊ शकतात.
केस धुण्याची वारंवारता तुमच्या केसांच्या प्रकारावर अवलंबून असते. तेलकट केसांसाठी आठवड्यातून दोन-तीन वेळा, तर कोरड्या केसांसाठी आठवड्यातून एक-दोन वेळा केस धुणे पुरेसे टरु शकते.
शॅम्पू करण्यापूर्वी केसांना तेल लावल्यास केस मजबूत आणि निरोगी राहतात.
केस धुताना बोटांच्या टोकांनी टाळूला मसाज करावे. शॅम्पू व्यवस्थितरित्या लावावा आणि पाण्याने पूर्णपणे धुवून घ्यावे.