सकाळ डिजिटल टीम
पुर्वी लोक जेवनासाठी मातीच्या भांड्यांचाच वापर करत होते.
मातीच्या भांड्यांचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
मातीच्या भांड्यात जेवन केल्याने कोणते फायदे मिळतात जाणून घ्या.
मातीच्या भांड्यात अन्न शिजवल्याने ते अधिक पौष्टिक आणि स्वादिष्ट बनते. तसेत ते आरोग्यासाठी देखील चांगले मानले जाते.
मातीच्या भांड्यात लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरससारखे खनिजे अढळतात. त्यामुळे अन्न शिजवताना ही खनिजे अन्नात मिसळतात आणि शरीरासाठी आवश्यक पोषक तत्वे मिळवतात.
मातीच्या भांड्यात उष्णता समानरीत्या पसरते, ज्यामुळे अन्न व्यवस्थित शिजते आणि त्याची चव वाढते.
मातीच्या भांड्यात अन्न शिजवल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. मातीतील घटक शरीरातील हानिकारक पदार्थांना बाहेर काढायला मदत करतात.
मातीच्या भांड्यात स्वयंपाक करणे खूप सुरक्षित मानले जाते.
मातीची भांडी पारंपारिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाची मानली जातात.