Saisimran Ghashi
शिवाजी महाराजांनी स्त्रियांना अत्यंत सन्मानाचे स्थान दिले होते. स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा केली जात असे.
शिवरायांनी स्त्रियांना "कन्याशक्ती" मानले. छत्रपती शिवाजी राजांचा दंडक होता, की स्वराज्यातील व परराज्यांतील स्त्रियांचा आदर केला पाहिजे.
मोगली फौजेतील रायबाघीण शिवरायांच्या विरोधात उमरखिंडीत लढली. त्यात तिचा पराभव झाला. ती पकडली गेली, तेव्हा शिवाजीराजांनी तिला तिच्या हुद्यानुसार सन्मानाची वागणूक दिली.
शिवाजी महाराजांचे सरदार आबाजी सोनदेव कल्याणच्या सुभेदाराची सुंदर कन्या घेऊन आले.
शिवाजी महाराजांनी तिची सुंदरता पाहून तिचे कौतुक केले आणि तिला सन्मानपूर्वक परत पाठवले. त्यांनी सांगितले की, "जर मी या माऊलीच्या पोटी जन्मलो असतो, तर मी देखील इतका सुंदर असतो."
रांझे गावच्या पाटलाने एका महीलेवर अत्याचार करून तिलाला मारून टाकले.
शिवाजी महाराज यांनी आपल्या सैनिकांना त्या रांझे गावच्या पाटलाला,घोड्याला बांधुन ओढून आणायला सांगीतले. आणी त्या पाटलाला चौरंग शिक्षा दिली.
परकीय आक्रमकांकडून महिलांवर होणाऱ्या अत्याचारांना थांबवण्यासाठी शिवरायांनी कठोर नियम केले होते.