झोप लागत नाही? 'लाईट थेरपी' ठरू शकते रामबाण; जाणून घ्या कसं काम करतं हे तंत्र

Shubham Banubakode

लाईट थेरेपीचा पर्याय

झोप न लागणे, थकवा जाणवणे, चिडचिड होणे, अशा समस्या आज अनेकांना भेडसावत आहेत. अशावेळी 'लाइट थेरपी' हा पर्याय चर्चेत आहे.

Light Therapy for Sleep Problems

|

esakal

लाइट थेरपी म्हणजे काय?

या पद्धतीमध्ये नैसर्गिक सूर्यप्रकाशासारखा कृत्रिम प्रकाश समोर बसून घेतला जातो. यासाठी विशेष लाइट थेरपी बॉक्सचा वापर केला जातो.

Light Therapy for Sleep Problems

|

esakal

'बॉडी क्लॉक' रीसेटसाठी मदत

या थेरेपीमुळे शरीरातील Circadian Rhythm योग्य पद्धतीने काम करण्यास मदत होते. त्यामुळे झोपेचं चक्र नियमित होऊ शकते.

Light Therapy for Sleep Problems

|

esakal

मूड सुधारण्यासही मदत

प्रकाशामुळे मेलाटोनिन आणि सेरोटोनिनसारख्या हार्मोन्सच्या संतुलन राखण्यास मदत होते. त्यामुळे मूड सुधारण्यास मदत होते.

Light Therapy for Sleep Problems

|

esakal

कोणाला जास्त फायदा?

हिवाळ्यात किंवा कमी सूर्यप्रकाशामुळे होणारा Seasonal Affective Disorder आणि सर्कॅडियन रिदम बिघडलेल्या व्यक्तींमध्ये अधिक फायदा दिसून येतो.

Light Therapy for Sleep Problems

|

esakal

योग्य वेळ कोणती?

तज्ज्ञांच्या मते, लाइट थेरपीचा वापर शक्यतो सकाळी करावा. यात प्रकाशाकडे सतत पाहण्याची गरज नसते; योग्य अंतरावर बसणे पुरेसे असते.

Light Therapy for Sleep Problems

|

esakal

डॉक्टरांचा सल्ला

डोळ्यांचे आजार, मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या किंवा इतर वैद्यकीय उपचार सुरू असतील तर लाइट थेरपी सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Light Therapy for Sleep Problems

|

esakal

थेरेपी उपचार नव्हे

लाइट थेरपी काही लोकांमध्ये झोप आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत करू शकते. पण ही मुख्य उपचार नसून तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

Light Therapy for Sleep Problems

|

esakal

महाराष्ट्रात मोठं रहस्य उघड! तळघरातला सापडला गुप्त मार्ग; थेट पोलीस अधीक्षक कार्यालयात जात असल्याचा दावा

Light Therapy for Sleep Problem

|

esakal

हेही वाचा -