Shubham Banubakode
पितळी भांड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या भंडारा शहरात उभा असलेला पांडे महाल हा शहराच्या ऐतिहासिक आणि स्थापत्य वारशाचा महत्त्वाचा भाग मानला जातो.
Pandey Mahal Bhandara
esakal
१९व्या शतकाच्या उत्तरार्धात उभारण्यात आलेली ही भव्य वास्तू आजही इतिहासप्रेमी आणि पर्यटकांचे आकर्षण ठरते.
Pandey Mahal Bhandara
esakal
पांडे महालाची उभारणी तत्कालीन मालगुजार पांडे कुटुंबाने केली. ब्रिटिश काळात या कुटुंबाचा परिसरात सामाजिक आणि आर्थिक प्रभाव होता.
Pandey Mahal Bhandara
esakal
महालाचे विशाल प्रवेशद्वार, जाड भिंती, लाकडी दरवाजे आणि प्रशस्त अंगण ही त्याची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
Pandey Mahal Bhandara
esakal
महालात एक प्रशस्त रंगमहाल असून, त्यामध्ये मोठे आरसे, आकर्षक झुंबर, कोरीव लाकडी काम आणि पारंपरिक सजावटीचे अनेक नमुने पाहायला मिळतात. ( फोटो साभार : विदर्भ दर्शन फेसबूक पेज)
Pandey Mahal Bhandara
esakal
पांडे महालात अनेक दशकांपासून गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू आहे. गणेशोत्सवाच्या काळात हा महाल भाविकांसाठी खुला केला जातो. ( फोटो साभार : विदर्भ दर्शन फेसबूक पेज)
Pandey Mahal Bhandara
esakal
पांडे महाल हा भंडाऱ्याच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि स्थापत्य इतिहासाचा महत्त्वाचा दस्तऐवज आहे.
Pandey Mahal Bhandara
esakal
महालाच्या तळघरात अनेक आश्चर्यकारक गोष्टी दडलेल्या असून तळघरातून गुप्त मार्ग थेट जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात निघतो, असा दावा केला जातो. ( फोटो साभार : विदर्भ दर्शन फेसबूक पेज)
Pandey Mahal Bhandara
esakal
या ऐतिहासिक वास्तूचे संवर्धन करून पुढील पिढ्यांसाठी जतन करण्याची मागणी इतिहासप्रेमी आणि स्थानिक नागरिकांकडून सातत्याने केली जात आहे.
Pandey Mahal Bhandara
esakal
Most Expensive Soup Made from Bird's Nest
esakal