संतोष कानडे
पावसाळ्यामध्ये ढगांचा गडगडाट आणि वीज चमकत असताना शक्यतो घरातच सुरक्षित राहा.
मोकळे मैदान, टेकडी, नदी, तलाव किंवा झाडाखाली उभे राहू नका.
हातात छत्री, मासेमारीची काठी किंवा इतर धातूच्या वस्तू घेऊन उभे राहणे टाळा.
मोबाईल वापरणे सुरक्षित असले तरी चार्जिंगला लावलेला फोन वापरू नका.
घरातील वायरने जोडलेली विद्युत उपकरणे आणि लँडलाइन फोन वापरणे टाळा.
वाहनात असाल तर शक्यतो वाहनातून बाहेर पडू नका; बंद वाहन तुलनेने सुरक्षित असते.
केस उभे राहणे किंवा झिणझिण्या जाणवल्यास त्वरित खाली बसून दोन्ही पाय एकत्र ठेवा.
पाण्यात पोहणे किंवा पाण्यात उभे राहणे तात्काळ थांबवा आणि सुरक्षित ठिकाणी जा.
वीज पडल्याने एखादी व्यक्ती जखमी झाल्यास तिला त्वरित वैद्यकीय मदत मिळवून द्या आणि आपत्कालीन सेवांना संपर्क करा.
महत्त्वाचं म्हणजे, हवामान खात्याचे इशारे आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा.