Pranali Kodre
एमएस धोनीने ‘Captain Cool’ हे नाव अधिकृतपणे ट्रेडमार्क केले आहे. त्यामुळे आता हे नाव कुणीही वापरू शकत नाही.
खेळाडू त्यांच्या नावांवर ट्रेडमार्क घेतात जेणेकरून कोणीही त्यांचा ब्रँड वापरू नये.
धोनीपूर्वीही अनेक दिग्गज भारतीय खेळाडूंनी स्वतःच्या नावावर किंवा टोपणनावावर ट्रेडमार्क घेतला आहे.
सचिन तेंडुलकरने आपल्या ‘Master Blaster’ या टोपणनावावर ट्रेडमार्क घेतला आहे.
युवराज सिंगने स्वतःचं नाव ‘Yuvraj’ आणि टोपणनाव ‘Yuvi’ ट्रेडमार्क केलं आहे.
विराट कोहलीने आपल्या नावासह 'VK' हा लोगो देखील ट्रेडमार्क केला आहे.
रोहित शर्माने त्याचे प्रसिद्ध टोपणनाव ‘Hitman’ ट्रेडमार्क करून अधिकृत केलं आहे.
फुटबॉल स्टार रोनाल्डोने ‘CR7’ हे ट्रेडमार्क करून त्यावरून अनेक वस्तू बनवल्या आहेत – जसे परफ्युम्स, शर्ट्स, शॉर्ट्स वगैरे.
मेस्सीने आपल्या ‘MESSI’ नावाचा ट्रेडमार्क EU न्यायालयातून जिंकून घेतला.
बास्केटबॉल महानायक मायकेल जॉर्डनचा ‘Jumpman’ लोगो आणि नाव दोन्ही ट्रेडमार्क आहेत.
टेनिस दिग्गज रॉजर फेडररने ‘RF’ हे स्वतःचं ट्रेडमार्क केलं आहे.