Aarti Badade
आजच्या धावपळीच्या युगात तरुणांपासून वृद्धांपर्यंत 'अनिद्रा' (Insomnia) ही एक गंभीर समस्या बनली आहे. याकडे केवळ थकवा म्हणून पाहणे भविष्यात महागात पडू शकते.
Better Sleep Tips
Sakal
पुरेशी झोप न मिळाल्यास मेंदूला विश्रांती मिळत नाही. यामुळे स्वभाव चिडचिडा होतो, कामात एकाग्रता राहत नाही आणि विनाकारण राग येऊ लागतो.
Better Sleep Tips
Sakal
आर्थिक चिंता, कामाचा ताण आणि भविष्याची भीती यामुळे रात्री मेंदू सतत विचार करत राहतो. हा मानसिक ताण झोपेचा सर्वात मोठा शत्रू आहे.
Better Sleep Tips
Sakal
झोपण्यापूर्वी मोबाईल किंवा लॅपटॉप वापरताय? स्क्रीनचा निळा प्रकाश शरीरातील 'मेलाटोनिन' (Melatonin) हार्मोनची निर्मिती थांबवतो, ज्यामुळे झोप उडते.
Better Sleep Tips
Sakal
रात्री उशिरा चहा, कॉफी किंवा एनर्जी ड्रिंक्स घेतल्याने कॅफेनमुळे शरीर सतर्क राहते. यामुळे झोपेचे चक्र विस्कळीत होते आणि शरीर पूर्णपणे रिलॅक्स होत नाही.
Better Sleep Tips
Sakal
रात्री उशिरा तेलकट किंवा जड जेवण केल्याने पचनसंस्थेवर ताण येतो. ॲसिडिटी आणि पोटदुखीमुळे झोपेत वारंवार व्यत्यय येतो.
Better Sleep Tips
Sakal
शांत झोपेसाठी झोपण्यापूर्वी किमान १ तास आधी सर्व इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स बाजूला ठेवा. पुस्तके वाचा किंवा शांत संगीत ऐका.
Better Sleep Tips
Sakal
वेळेवर झोपणे, सकस आहार आणि दररोज व्यायाम हीच निरोगी आयुष्याची सूत्रे आहेत. झोप पूर्ण घ्या आणि मानसिक आरोग्य जपा!
Better Sleep Tips
Sakal
Stomach Cancer Prevention
Sakal