Varsha Balhe
सिंह आणि बिबट्या हे दोन्ही मोठे शिकारी प्राणी आहेत. पण त्यांचा आकार, शरीरावरील नक्षी, राहण्याची पद्धत आणि शिकार करण्याची पद्धत यात मोठा फरक आहे.
LION VS LEOPARD DIFFERENCE
esakal
सिंह हा बिबट्यापेक्षा खूप मोठा आणि वजनदार असतो. बिबट्या आकाराने लहान, पण मजबूत आणि चपळ असतो.
LION VS LEOPARD DIFFERENCE
esakal
सिंहाच्या अंगावर ठिपके किंवा पट्टे नसतात. त्याचा रंग साधारण पिवळसर किंवा वाळूसारखा असतो. बिबट्याच्या अंगावर काळे ठिपके असतात, ज्यांना रोसेट्स म्हणतात.
LION VS LEOPARD DIFFERENCE
esakal
नर सिंहाच्या डोक्याभोवती आणि मानेवर लांब केसांची आयाळ असते. बिबट्याला अशी आयाळ नसते.
LION VS LEOPARD DIFFERENCE
esakal
सिंह सहसा कळपात म्हणजेच ‘प्राइड’मध्ये राहतो. याउलट, बिबट्या हा एकटा राहणारा प्राणी आहे. तो बहुतेक वेळा एकटाच फिरतो आणि शिकार करतो.
LION VS LEOPARD DIFFERENCE
esakal
बिबट्या उत्तम प्रकारे झाडावर चढू शकतो. तो शिकारही झाडावर नेऊन ठेवतो. सिंह मात्र बिबट्यासारखा झाडावर चढण्यासाठी ओळखला जात नाही.
LION VS LEOPARD DIFFERENCE
esakal
सिंह मोठ्या प्राण्यांची शिकार करतो आणि अनेकदा समूहातील इतर सिंहांचीही मदत घेतो. बिबट्या मात्र दबा धरून, शांतपणे जवळ जात शिकार करण्यासाठी ओळखला जातो.
LION VS LEOPARD DIFFERENCE
esakal
सिंहाचं शरीर मोठं आणि ताकदवान असतं. बिबट्या तुलनेने लहान असला तरी त्याचं शरीर मजबूत आणि चपळ असतं. त्यामुळे तो झाडावरही सहज चढू शकतो.
LION VS LEOPARD DIFFERENCE
esakal
सिंहाची ओळख त्याचा मोठा आकार, ताकद आणि समूहात राहण्याच्या पद्धतीमुळे होते. तर बिबट्याची खासियत म्हणजे त्याची चपळता, लपून शिकार करण्याची पद्धत आणि झाडावर चढण्याची क्षमता.
LION VS LEOPARD DIFFERENCE
esakal
BLACK LEOPARD VS NORMAL LEOPARD
esakal