Monika Shinde
अनेकांना पावसाळ्यात- हिवाळ्यात त्वचेशी निगडित अनेक समस्यांशी सामना करावा लागतो. विशेषतः ओठं फुटणे, कोरडे पडणे, किंवा सतत ओठं सुकणे, इत्यादी समस्यानी सामोरे जावे लागतात. विशेषतः हिवाळ्यात थंड हवेमुळे पाणी कमी पिण्यात येते. त्यामुळे शरीरातील काही पोषणतंतूं कमी होतात. घरगुती पद्धतीने ओठांची काळजी घेण्यासाठी काही घरगुती उपाय जाणून घ्या
आवळा तेल ओठांवर लावल्याने ते नरम आणि हायड्रेटेड राहते. आवळा तेलात विटामिन C असतो. जो आपल्या त्वचेच्या पुनर्निर्माणासाठी उपयुक्त ठरतो. आणि ओठं कोरडे पडत नाहीत.
तूप हे ओठांना नैसर्गिकपणे हायड्रेट करण्यासाठी खूप प्रभावी आहे. थोडं तूप ओठांवर लावल्यास ते मऊ होतात आणि कोरडेपणामुळे होणारा वेदना देखील कमी होतो.
मध ओठांवर लावल्यास ते मऊ आणि आकर्षक दिसतात. मध ओठांना मॉइश्चराइज करतो. कोरडे होत नाहीत. आणि ओठ फुटत नाहीत.
नारळ तेल हे एक उत्तम मॉइश्चरायझर आहे. थोडं नारळ तेल ओठांवर लावून रात्री झोपताना ठेवल्यास ते पुन्हा मऊ आणि कोरडेपणापासून मुक्त होतात.
ओठांचे कोरडेपण कमी करायचं असेल तर शरीराला पुरेसे पाणी देणं महत्वाचं आहे. पाणी पिल्याने ओठांचा नैसर्गिक नमी टिकून राहते.
पपईमध्ये जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आणि इन्झाइम्स असतात, जे ओठांच्या मृत त्वचेला बाहेर टाकण्यास मदत करतो. पपईचा तुकडा ओठांवर घासून त्याला काही वेळा ठेवा आणि नंतर स्वच्छ धुवा.