Monika Shinde
अचानक खरेदी, आकर्षक ऑफर्स आणि ब्रँडच्या मोहापासून दूर राहा. या टिप्स तुम्हाला पैशांची बचत आणि शहाणपणाची खरेदी कशी करावी ते शिकवतील.
कितीही सवलती असल्या तरी स्वतःसाठी एक खर्चमर्यादा ठरवा. बजेट ठरवलं की अनावश्यक खर्च टळतो आणि गरजेपुरती खरेदी होते.
कधीही बाजारात जाताना लिस्ट तयार असू द्या. यादीशिवाय खरेदी म्हणजे गोंधळ. लिस्टमुळे लक्ष विचलित होत नाही आणि खर्चावर नियंत्रण राहतं.
सवलतीमुळे गरज नसलेली वस्तू विकत घेण्याचा मोह होतो. सवलत असली तरी गरज असेल तरच खरेदी करा अन्यथा ती फसवणूक ठरते!
ऑनलाइन व ऑफलाइन दरांची तुलना करा. अनेकदा एकाच वस्तूचे विविध दर असतात. किंमत तपासा आणि योग्य ठिकाणावरून खरेदी करा.
नेहमी मोठ्या ब्रँडकडे धावू नका. क्वालिटी आणि युटिलिटी महत्त्वाची आहे. कमी किमतीतही दर्जेदार पर्याय मिळू शकतात.
खरेदी करताना क्षणिक भावना टाळा. आवडलेली वस्तू लगेच घेऊ नका, एक दिवस थांबा. गरज खरी असेल तरच ती टिकते.
जिथे शक्य आहे तिथे पैसे वाचवा आणि वाचवलेले पैसे चांगल्या योजनांमध्ये गुंतवा. स्मार्ट शॉपिंग ही केवळ खरेदी नाही, तर भविष्याची तयारी आहे