Vrushal Karmarkar
यावेळी आपल्याला एक नवीन आयपीएल चॅम्पियन संघ मिळेल हे निश्चित आहे. कारण २००८ पासून खेळणाऱ्या पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने अद्याप कोणतेही आयपीएल विजेतेपद जिंकलेले नाही.
दोन्ही संघ मंगळवार, ३ जून रोजी नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर अंतिम सामना खेळतील. २००८ पासून आतापर्यंत प्रत्येक हंगामात कोणता संघ चॅम्पियन बनला आणि कोणता उपविजेता राहिला. हे माहिती आहे का?
आयपीएलचा पहिला हंगाम २००८ मध्ये खेळवण्यात आला. राजस्थान रॉयल्स आयपीएलच्या इतिहासात विजेतेपद जिंकणारा पहिला संघ ठरला. राजस्थानने अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करून जेतेपद पटकावले.
दुसऱ्या हंगामात डेक्कन चार्जर्सने विजेतेपद जिंकले. हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सहा धावांनी पराभव केला.
चेन्नई सुपर किंग्जचे २००८ मध्ये जेतेपद हुकले. परंतु २०१० मध्ये संघाने जेतेपद जिंकले. चेन्नईने अंतिम सामन्यात मुंबईला २२ धावांनी हरवून विजेतेपद पटकावले.
चेन्नई सुपर किंग्जने सलग दुसऱ्या हंगामात विजेतेपद जिंकले. चेन्नईने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ५८ धावांनी पराभव करून विजेतेपद पटकावले.
२०१२ मध्ये आयपीएलला एक नवीन चॅम्पियन मिळाला. कोलकाता नाईट रायडर्सने पाचवा सीझन जिंकला. केकेआरने अंतिम सामन्यात चेन्नईचा पाच विकेट्सने पराभव केला.
२०१३ मध्ये आयपीएलला आणखी एक नवा विजेता मिळाला. मुंबई इंडियन्सने विजेतेपद जिंकले. अंतिम सामन्यात मुंबईने चेन्नई सुपर किंग्जचा २३ धावांनी पराभव केला.
आयपीएल २०१४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने पुन्हा एकदा विजेतेपद पटकावले. कोलकाताने अंतिम सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबचा तीन विकेट्सने पराभव केला.
आयपीएल २०१५ मध्ये मुंबई इंडियन्स संघ पुन्हा एकदा चॅम्पियन बनला. मुंबईने पुन्हा एकदा अंतिम सामन्यात चेन्नईचा पराभव केला. मुंबई इंडियन्सने ४१ धावांनी विजय मिळवला.
आयपीएलचा नववा हंगाम सनरायझर्स हैदराबादने जिंकला. हैदराबादने २०१६ मध्ये शानदार कामगिरी केली. अंतिम सामन्यात हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा आठ धावांनी पराभव केला.
आयपीएल २०१७ मध्ये, मुंबई इंडियन्स संघ तिसऱ्यांदा चॅम्पियन बनला. अंतिम सामन्यात मुंबईने रायझिंग पुणे सुपरजायंट्सचा एका धावेने पराभव केला होता.
चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल २०१८ मध्ये पुनरागमन केले. अंतिम सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा आठ विकेट्सने पराभव केला.
आयपीएल २०१९ च्या अंतिम सामन्यात, मुंबई इंडियन्सने एका रोमांचक सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा एका धावेने पराभव केला आणि चौथ्यांदा आयपीएलचे विजेतेपद जिंकले.
कोरोनामुळे आयपीएल २०२० सप्टेंबरमध्ये सुरू झाले. या हंगामात मुंबई इंडियन्सने विजय मिळवला होता. अंतिम सामन्यात मुंबईने दिल्ली कॅपिटल्सचा पाच विकेट्सने पराभव केला.
आयपीएल २०२१ चे विजेतेपद चेन्नई सुपर किंग्जने जिंकले. अंतिम सामन्यात संघाने कोलकाता नाईट रायडर्सचा २७ धावांनी पराभव केला.
गुजरात टायटन्स संघाने आयपीएल २०२२ चे विजेतेपद जिंकले आहे. अंतिम सामना गुजरात आणि राजस्थान यांच्यात खेळवण्यात आला. अंतिम सामन्यात गुजरातने राजस्थानचा सात विकेट्सने पराभव केला.
चेन्नई सुपर किंग्ज संघ पाचव्यांदा चॅम्पियन बनला. शेवटच्या चेंडूवर पाच विकेट गमावून सीएसकेने गुजरातचा पराभव केला होता.
आयपीएल २०२४ च्या अंतिम सामन्यात कोलकाताने सनरायझर्स हैदराबादचा आठ विकेट्सनी पराभव केला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघ तिसऱ्यांदा विजेतेपद जिंकण्यात यशस्वी झाला.
पेशवेकाळातील साडेतीन शहाणे कोण?