Pranali Kodre
इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेत अनेक युवा खेळाडू खेळतात. पण प्रत्येक संघाकडून खेळलेला सर्वात कमी वयाचा खेळाडू कोण, हे आपण जाणून घेऊ.
Vaibhav Sooryavanshi
Sakal
राजस्थान रॉयल्ससाठी सर्वात युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी ठरला आहे. त्याने १४ वर्षे २३ दिवस वय असताना या संघाकडून पदार्पण केले होते.
Vaibhav Sooryavanshi
Sakal
प्रयास रे बर्मन हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून आयपीएल खेळलेला सर्वात युवा खेळाडू. त्याने १६ वर्षे १५७ दिवस वय असताना बंगळुरूसाठी पहिला सामना खेळला होता.
Prayas Ray Barman
Sakal
पंजाब किंग्ससाठी मुजीब उर रेहमान सर्वात युवा खेळाडू ठरला होता, त्याने १७ वर्षे ११ दिवस वय असताना पंजाब किंग्ससाठी पहिला सामना खेळला होता.
Mujeeb Ur Rahman
Sakal
प्रदीप सांगवान हा दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळलेला सर्वात युवा खेळाडू आहे, त्याने १७ वर्षे १७९ दिवस वय असताना पदार्पण केले होते.
Pradeep Sangwan
Sakal
चेन्नई सुपर किंग्ससाठी आयुष म्हात्रे हा सर्वात युवा खेळाडू ठरला. त्याने १७ वर्षे २७८ दिवस वय असताना चेन्नई सुपर किंग्ससाठी पहिला सामना खेळला.
Ayush Mhatre
Sakal
मुंबई इंडियन्ससाठी क्वेना मफाका सर्वात युवा खेळाडू ठरला. त्याने १७ वर्षे २५४ दिवस वय असताना मुंबई इंडियन्ससाठी पहिला सामना खेळला.
Kwena Maphaka
Sakal
कोलताना नाईट रायडर्ससाठी मनदीप सिंग सर्वात युवा खेळाडू होता. त्याने १८ वर्षे ९४ दिवस वय असताना कोलकाता नाईट रायडर्ससाठी पहिला सामना खेळला.
Mandeep Singh
Sakal
नूर अहमद गुजरात टायटन्सचा सर्वात युवा खेळाडू होता, त्याने या संघासाठी १८ वर्षे १०३ दिवस वय असताना पदार्पण केले होते.
Noor Ahmad
Sakal
सनरायझर्स हैदराबादसाठी सर्वात युवा खेळाडू राशिद खान होता. त्याने १८ वर्षे १९७ दिवस वय असताना सनरायझर्स हैदराबादसाठी पहिला सामना खेळला होता.
Rashid Khan
Sakal
अर्शिन कुलकर्णी हा लखनौ सुपर जायंट्सचा सर्वात युवा खेळाडू असून त्याने १९ वर्षे ७५ दिवस वय असताना लखनौ सुपर जायंट्ससाठी पहिला सामना खेळला होता.
Arshin Kulkarni
Sakal
Virat Kohli
Sakal