Aarti Badade
विषारी घटक बाहेर काढणे, चयापचय सुधारणे आणि ऊर्जा साठवणे ही कामे लिव्हरच करतो. पण जेव्हा लिव्हर आजारी पडतं, तेव्हा शरीर काही गंभीर संकेत देऊ लागतं.
Liver Disease Symptoms
Sakal
लिव्हर नीट काम करत नसेल, तर मूत्राचा रंग गडद पिवळा किंवा तपकिरी होऊ शकतो. तसेच मलाचा रंग फिकट किंवा पांढुरका होणे हे पित्त प्रवाहात अडथळा असल्याचे लक्षण आहे.
Liver Disease Symptoms
Sakal
वजन कमी होणे, थकवा जाणवणे, भूक न लागणे,डोळे नखे पिवळी होणे ही लिव्हर खराब झाल्याची प्राथमिक लक्षणे आहेत. त्वचेवर सतत खाज सुटणे हे देखील यकृताच्या समस्येचे लक्षण असू शकते.
Liver Disease Symptoms
Sakal
लिव्हरच्या पेशी दुरुस्त करण्यासाठी अँटीऑक्सिडंट्सची गरज असते. बेरीज, संत्री, मोसंबी यांसारखी सिट्रस फळे आणि ब्रोकोली, कोबी, पालेभाज्या यांचा समावेश करा.
Liver Disease Symptoms
Sakal
तपकिरी तांदूळ, गहू, डाळी आणि संपूर्ण कडधान्ये खाल्ल्याने पचन सुधारते. फायबरमुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते आणि 'फॅटी लिव्हर'चा धोका कमी होतो.
Liver Disease Symptoms
Sakal
अॅव्होकॅडो, ऑलिव्ह ऑईल, अक्रोड आणि बिया यामध्ये चांगल्या प्रतीचे फॅट्स असतात. लिव्हरमध्ये साचलेली अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करतात. सॅच्युरेटेड फॅट्स (लोणी, डालडा) खाणे टाळा.
Liver Disease Symptoms
Sakal
पुरेसे पाणी पिणे हा लिव्हर निरोगी ठेवण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. पाणी मूत्राद्वारे विषारी घटक बाहेर टाकण्याची प्रक्रिया सुलभ करते आणि लिव्हरवरचा ताण कमी करते. ३-४ लिटर पाणी प्या.
Liver Disease Symptoms
Sakal
बाहेरचे तेलकट-तुपकट पदार्थ आणि मद्यपान टाळा. वेळेवर झोपणे आणि व्यायाम करणे या सवयी लिव्हरला दीर्घकाळ निरोगी ठेवतात. डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Liver Disease Symptoms
Sakal
High cholesterol symptoms
Sakal