लिव्हर निकामी होण्यापूर्वी पायांमध्ये दिसतात 'हे' बदल!

Aarti Badade

लिव्हरचे शरीरातील महत्त्व

लिव्हर हा शरीरातील एक महत्त्वाचा अवयव असून तो विषारी पदार्थ बाहेर टाकणे, पचन आणि हार्मोन बॅलन्समध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो.

Liver disease symptoms in legs

|

Sakal

पाय आणि घोट्यावर सूज येणे

लिव्हर नीट काम करत नसेल तर शरीरात 'फ्लुइड रिटेंशन' होऊ लागते, ज्यामुळे पाय, घोटा आणि पंजावर स्पष्ट सूज दिसून येते.

Liver disease symptoms in legs

|

Sakal

पायांच्या त्वचेला सतत खाज सुटणे

लिव्हरच्या आजारामुळे पित्ताचा प्रवाह विस्कळीत होतो आणि शरीरात 'बैल सॉल्ट्स' जमा होतात, ज्यामुळे पायांच्या त्वचेला वारंवार खाज सुटते.

Liver disease symptoms in legs

|

sakal

पायात जडपणा आणि सुन्नपणा

लिव्हर डॅमेज झाल्यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडत नाहीत, परिणामी पायात जडपणा, वेदना किंवा पाय सुन्न होण्याचे प्रकार घडतात.

Liver disease symptoms in legs

|

Sakal

नसा फुगणे आणि निळ्या दिसणे

लिव्हर सिरोसिसच्या गंभीर स्थितीत हार्मोनल असंतुलन होते, ज्यामुळे पायातील निळ्या नसा फुगलेल्या किंवा कोळ्याच्या जाळ्यासारख्या (Spider Veins) दिसू शकतात.

स्नायू आखडणे आणि थकवा

लिव्हरशी संबंधित आजारामुळे पायाचे स्नायू अचानक आखडतात, ज्यामुळे चालताना कमजोरी आणि सतत थकवा जाणवतो.

Liver disease symptoms in legs

|

Sakal

पायाचा रंग बदलणे आणि मुंग्या येणे

रक्ताभिसरण विस्कळीत झाल्यामुळे पायाचा रंग निळा किंवा जांभळा दिसू शकतो, तसेच नर्व्हस सिस्टमवर परिणाम झाल्याने पायात सतत मुंग्या येतात.

Liver disease symptoms in legs

|

Sakal

मधुमेह असणारे फळांचा रस पिऊ शकतात का? जाणून घ्या

Diabetes and fruit juice

|

Sakal

येथे क्लिक करा