Payal Naik
लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता विकी कौशल याच्या 'छावा' या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावलंय.
या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा सांगितली आहे.
पहिल्या पाच दिवसातच हा चित्रपट २०० कोटीच्या आसपास पोहोचलाय.
या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या पत्नी राजमाता सोयराबाई भोसले यांनाही दाखवण्यात आलंय.
त्यांना एक मुलगा होता. त्याचं नाव राजाराम राजे. राजाराम आणि संभाजी महाराज सावत्र भाऊ होते.
राजाराम महाराज गादीवर बसावे अशी सोयराबाई यांची इच्छा होती.
त्यासाठी त्यांनी अनेकदा कारस्थानं केली असल्याचं सांगण्यात येतं.
'छावा' चित्रपटात ही भूमिका अभिनेत्री दिव्या दत्ता हिने साकारली आहे.
या भूमिकेसाठी दिव्या दत्ताने ४५ लाख रुपये मानधन घेतलं आहे. तिचा स्क्रीन टाइमदेखील कमी आहे.
महाराष्ट्रातील 'या' ठिकाणांवर झालंय 'छावा'चं शूटिंग; तुम्ही ओळखलंत का?