लोहगड किल्ला अन् सुरतेची लूट! काय आहे इतिहास?

संतोष कानडे

लोहगड किल्ला

पुण्यापासून जवळ लोणावळ्यानजीक असेलला लोहगड किल्ला आजही इतिहासाची साक्ष देत खंबीरपणे उभा आहे.

स्मारक

भारत सरकारने २६ मे १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून या किल्ल्याची घोषणा केली होती.

लोहगड-विसापूर

१६५७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा कल्याण, भिवंडी परिसर जिंकला तेव्हा लोहगड-विसापूर हा परिसर स्वराज्यात सामील केला.

सुरतेची लूट

१६६४ मध्ये सुरतेची पहिली लूट झाली तेव्हा नेताजी पालकर यांनी ती संपत्ती लोहगडावरच आणून ठेवली होती.

इतिहासकार

इ.स.पूर्व २००० वर्षांपूर्वी या लोहगड किल्ल्याची निर्मिती झालेली असावी, असा अंदाज इतिहासकार बांधतात.

स्वराज्य

लोहगड किल्ल्याने सातवाहन, चालुक्य, यादव, निजामशाही, आदिलशाही, स्वराज्य, पेशवाई अशा राजवटी पाहिल्या आहेत.

गणेश दरवाजा

लोहगडावर गणेश दरवाजा, नारायण दरवाजा, हनुमान दरवाजा, महादरवाजा अशी मुख्य ठिकाणं आहेत.

गुहा

महत्त्वाची बाब म्हणजे शंभर लोक झोपू शकतील, एवढी मोठी गुहा लोहगडावर आहे.

विंचू कडा

कड्याच्या टोकावर बांधलेली चिरेबंदीची वाट, हे लोहगडाचे वैशिष्ट्य आहे. विशेष म्हणजे विंचू कडा हे पर्यटकांच्या आवडीचं ठिकाण आहे.

रात्रीच्या वेळी अदृश्य होणारा किल्ला बघितला का?

<strong>येथे क्लिक करा</strong>