Aarti Badade
पुणे शहराला समृद्ध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभव लाभले आहे. जर तुम्ही वीकेंड ट्रिप प्लॅन करत असाल, तर मजबूत असलेल्या 'लोहगड' किल्ल्याला नक्की भेट द्या.
Lohagad Fort Pune
Sakal
महाराष्ट्रातील लोणावळा आणि पुणे जवळ वसलेला हा किल्ला 1000 वर्षांहून अधिक प्राचीन आहे. ३३८९ फूट उंचीवर असलेला हा किल्ला मराठा स्थापत्यशैलीचा एक उत्कृष्ट नमुना मानला जातो.
Lohagad Fort Pune
Sakal
लोहगडचा सर्वात आकर्षक भाग म्हणजे 'विंचू काटा'. विंचवाच्या शेपटीसारखा आकार असलेल्या या लांबच लांब तटबंदीवरून सह्याद्रीचे विहंगम दृश्य दिसते, जे पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फेडते.
Lohagad Fort Pune
Sakal
पावसाळ्यात आणि हिवाळ्यात लोहगड ट्रेकिंगसाठी सर्वोत्तम ठिकाण आहे. सातवाहन काळात बांधल्या गेलेल्या या किल्ल्यावर चढाई करताना निसर्गाचा सुंदर नजारा आणि ढगांची दुलई पाहायला मिळते.
Lohagad Fort Pune
Sakal
किल्ल्यावर प्रवेश करताना भव्य 'महा दरवाजा' आपले स्वागत करतो. त्याशिवाय किशोरी महाल, लक्ष्मी कोठी आणि प्राचीन पाण्याची टाकी हे या किल्ल्याचे मुख्य ऐतिहासिक आकर्षण आहेत.
Lohagad Fort Pune
Sakal
मजबुतीमुळे या किल्ल्याला 'लोहदुर्ग' किंवा 'Iron Fort' असेही संबोधले जाते. हा किल्ला अनेक युद्धांचा साक्षीदार असून आजही सुस्थितीत उभा आहे, जो शिवकालीन इतिहासाची साक्ष देतो.
Lohagad Fort Pune
sakal
लोहगडला भेट दिल्यानंतर तुम्ही जवळच असलेला विसापूर किल्ला, भाजे लेणी, पवना तलाव आणि कार्ले लेणी पाहू शकता. लोणावळ्याजवळ असल्याने येथे 'वन डे ट्रिप' सहज शक्य आहे.
Lohagad Fort Pune
Sakal
chhatrapati shivaji maharaj Brother Sambhaji Raje Bhosale death Mystery
Sakal