सकाळ डिजिटल टीम
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे इंद्रजित गुप्ता हे लोकसभेचे सर्वाधिक काळ खासदार होते. ते 1977 च्या निवडणुका वगळता 1960 ते 2001 पर्यंत त्यांनी विक्रमी 11 लोकसभा निवडणूक जिंकली.
अटलबिहारी वाजपेयी तीन वेळा पंतप्रधान होते. जनता पक्ष आणि नंतर भारतीय जनता पक्षाकडून त्यांनी 10 वेळा लोकसभेची जागा जिंकली.
सोमनाथ चॅटर्जी हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी) सदस्य म्हणून 10 वेळा लोकसभेवर निवडून आले. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील UPA-I च्या काळात ते लोकसभेचे 14 वे अध्यक्ष होते.
काँग्रेस नेते पी एम सईद हे 1967 ते 2004 पर्यंत सलग 10 वेळा लोकसभेवर निवडून आले. 1967 मध्ये स्थापन झाल्यापासून त्यांनी लक्षद्वीप मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ हे मध्य प्रदेशातील छिंदवाडा मतदारसंघातून नऊ वेळा लोकसभेवर निवडूण गेले आहेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य म्हणून ते 1980 मध्ये पहिल्यांदा 7 व्या लोकसभेवर निवडून आले होते.
जॉर्ज फर्नांडिस हे नऊ वेळा लोकसभेवर निवडून आलेले राजकारणी होते. फर्नांडिस यांनी केंद्र सरकारमध्ये संरक्षण, रेल्वे आणि उद्योग यासह महत्त्वाची खाती सांभाळली आहेत.
सिंधिया घराण्याचे वंशज माधवराव सिंधिया यांनी काँग्रेससोबत काम केले आणि नऊ वेळा लोकसभा सदस्य बनले. त्यांनी विविध सरकारांतर्गत रेल्वे, पर्यटन, नागरी विमान वाहतूक आणि मानव संसाधन विकास ही खाती सांभाळली.