Sandip Kapde
शिवाजी महाराजांनी १६ जुलै १६७३ रोजी चिंचवडच्या अधिकाऱ्यांना मुघलांपासून प्रजेचे रक्षण करण्यासाठी महत्त्वपूर्ण पत्र लिहिले.
shivaji maharaj
esakal
महाराजांनी विविध देवस्थानांना इनामे देऊन त्यांची नियमित व्यवस्था आणि सेवा कायम ठेवली.
shivaji maharaj
esakal
देवस्थानांबाबतची अनेक ऐतिहासिक पत्रे आजही उपलब्ध असून त्यात चिंचवड देवस्थानाशी संबंधित पत्रांची संख्या मोठी आहे.
shivaji maharaj
esakal
देवस्थानांच्या व्यवस्थापनाबाबत शिवाजी महाराजांनी स्पष्ट नियम आणि जबाबदाऱ्या निश्चित केल्या होत्या.
shivaji maharaj
esakal
सभासद बखरीत महाराजांनी देव, देवस्थानांच्या दिवाबत्ती, नैवेद्य, अभिषेक या सर्वांची योग्य पाहणी करण्याचे आदेश दिल्याचे नमूद आहे.
shivaji maharaj
esakal
मुस्लिमांच्या पीर-मसिदींच्या दिवाबत्ती आणि सेवेसाठीही महाराजांनी समान आदर व देखरेख राखण्याचे धोरण ठेवले.
shivaji maharaj
esakal
वेदशास्त्रात निपुण असलेल्या ब्राह्मणांचा योगक्षेम पाहण्याची जबाबदारी महाराजांनी अत्यंत मनोभावे पार पाडली.
shivaji maharaj
esakal
ब्राह्मण, ज्योतिषी, तपस्वी आदींच्या कुटुंबांना लागणारे धान्य-द्रव्य गावोगावी निश्चित करून देण्याची सोय त्यांनी केली.
shivaji maharaj
esakal
महालीनुसार वाटप झालेल्या धान्य-द्रव्याची सालोदर कारकूनांकडून नीट पावती घेण्याची पद्धत होती.
shivaji maharaj
esakal
राजाच्या कल्याणासाठी ब्राह्मणांनी अन्नभक्षण, स्नानसंध्या आणि धार्मिक आचार पाळून राज्याची सुखसमृद्धी चिंतावी, अशी महाराजांची अपेक्षा होती.
shivaji maharaj
esakal
Chhatrapati Shivaji Maharaj
esakal