Monika Shinde
श्री गणपती हे भक्तांच्या इच्छापूर्तीसाठी ओळखले जातात. त्यांना आवडणाऱ्या गोष्टींपैकी एक म्हणजे विशिष्ट रंग. चला पाहूया, कोणते रंग त्यांना प्रिय आहेत.
लाल रंग हा श्री गणेशाचा अत्यंत प्रिय रंग मानला जातो. हा रंग ऊर्जा, शक्ती आणि भक्तिभावाचे प्रतीक आहे. गणेश पूजेमध्ये लाल फुलांचे महत्त्व आहे.
पिवळा रंग शुभतेचा आणि समृद्धीचा प्रतीक आहे. गणपतीला पिवळ्या रंगाचे फुलं, वस्त्र आणि प्रसाद अर्पण केल्यास सौभाग्य प्राप्त होते, असे मानले जाते.
केशरी रंग हे भक्ती आणि त्यागाचे प्रतीक आहे. गणेशोत्सवात केशरी फेटे, ध्वज आणि वस्त्र यांचा वापर विशेष मानला जातो. हा रंग उर्जादायक मानला जातो.
हिरवा रंग शांती, समृद्धी आणि निसर्गाशी जोडलेला आहे. काही ठिकाणी गणपती पूजेमध्ये हिरव्या पत्रीचे विशेष महत्त्व असते. हिरवा रंग प्रसन्नतेचे प्रतीक मानला जातो.
गणपती पूजेसाठी लाल, पिवळा किंवा केशरी रंगाचे कपडे परिधान करावेत. पूजेसाठी वापरण्यात येणारी फुले व वस्त्रही या रंगांचे असावेत, असे शास्त्र सांगते.
गणपतीला अर्पण करण्यात येणारे रंग केवळ सौंदर्यासाठी नसून त्यामागे आध्यात्मिक कारणेही आहेत. योग्य रंग वापरल्यास सकारात्मक ऊर्जा आणि आशीर्वाद प्राप्त होतो