Aarti Badade
वजन कमी करण्यासाठी आहारावर नियंत्रण ठेवणे सर्वात महत्त्वाचे आहे. काही नैसर्गिक पदार्थ वजन नियंत्रणात मदत करतात.
साखर, बटाटा आणि तांदूळ यांसारख्या पदार्थांमध्ये जास्त कार्बोहायड्रेट्स असतात, ज्यामुळे चरबी वाढते. यांचे सेवन कमी करावे.
फक्त गव्हाच्या पिठाची पोळी खाण्याऐवजी गहू, सोयाबीन आणि हरभरे मिश्रित पिठाची पोळी अधिक फायदेशीर ठरते.
दररोज पत्ताकोबीचा ज्यूस प्यावा. पत्ताकोबीमध्ये चरबी कमी करणारे गुणधर्म असतात आणि ते मेटाबॉलिझम सुधारते.
पपई नियमित खाल्ल्याने अतिरिक्त चरबी कमी होते. तसेच, दही खाल्ल्यानेही चरबी कमी होण्यास मदत होते.
प्रत्येक दिवशी घरात तयार केलेले एक ग्लास ताक प्यावे. तसेच, कारल्याची अर्धवट कच्ची भाजी वजन कमी करायला मदत करते.
आवळा आणि हळद समप्रमाणात घेऊन ताकात टाकून प्यायल्यास कंबर बारीक होते. एक चमचा पुदिन्याच्या रसात मध मिसळून घेतल्यासही वजन कमी होते.
लाल तिखटातील कॅप्सासिन वजन कमी करते. आहारात गाजर भरपूर प्रमाणात घ्यावा.
मध लठ्ठपणा कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. हिरडा किंवा बेहडा चूर्ण पडवळाच्या रसासोबत घेतल्याने लवकर वजन कमी होते आणि थकवा जातो.