शुगर लो झाल्यावर काय खावे? ग्लुकोज, ज्यूस की साखर?

Aarti Badade

रक्तातील साखर अचानक कमी झाली?

थरथर, घाम, चक्कर, अशक्तपणा किंवा हृदयाची धडधड वाढणे ही हायपोग्लायसेमियाची लक्षणं असू शकतात.

eat when blood sugar is low

|

Sakal

हायपोग्लायसेमिया

साखर 70 mg/dL पेक्षा कमी झाली तर सावध व्हा! या स्थितीला हायपोग्लायसेमिया किंवा लो ब्लड शुगर म्हटलं जातं आणि वेळीच उपाय करणे महत्त्वाचे असते.

eat when blood sugar is low

|

Sakal

काय खावे?

सुमारे 15 ग्रॅम पटकन शोषले जाणारे कार्बोहायड्रेट, जसे ग्लुकोज टॅब्लेट, ग्लुकोज जेल, साखरपाणी, मधपाणी किंवा फळांचा रस घेता येतो.

eat when blood sugar is low

|

Sakal

चरबीचे प्रमाण

पीनट बटर, बटर कुकीज किंवा आईस्क्रीम लगेच खाऊ नका! यामध्ये चरबीचे प्रमाण जास्त असल्याने साखरेचे शोषण तुलनेने मंद होऊ शकते.

eat when blood sugar is low

|

Sakal

15 मिनिटांनी पुन्हा साखर तपासा!

लक्षणं कमी झाली नाहीत किंवा रक्तातील साखर अजूनही कमी असेल तर पुन्हा सुमारे 15 ग्रॅम कार्बोहायड्रेट घेण्याची गरज भासू शकते.

eat when blood sugar is low

|

Sakal

लो ब्लड शुगर का होते?

इन्सुलिन किंवा मधुमेहाची औषधे, जेवण चुकणे किंवा उशिरा घेणे, जास्त व्यायाम अथवा औषधांचा जास्त डोस यामुळे साखर कमी होऊ शकते.

eat when blood sugar is low

|

Sakal

वैद्यकीय मदत

व्यक्ती बेशुद्ध असेल किंवा गिळता येत नसेल तर तोंडाने काहीही देऊ नका! झटके, बेशुद्धावस्था किंवा तीव्र गोंधळ असल्यास अन्न-पेय घशात अडकण्याचा धोका असतो, त्यामुळे तात्काळ वैद्यकीय मदत घ्या.

eat when blood sugar is low

|

Sakal

3-4 दिवस पोट साफ नाही? मग 'हे' उपाय कराच!

constipation relief

|

Sakal

येथे क्लिक करा