घरच्या घरी बनवा कमी कॅलरीजचे हाय प्रोटीन चिकन सँडविच!

Aarti Badade

वजन कमी करण्यासाठी हेल्दी चिकन सँडविच

चिकन ब्रेस्ट, भाज्या आणि हंग कर्डपासून तयार केलेले हे सँडविच चविष्ट असून वजन नियंत्रण आणि स्नायूंच्या वाढीसाठी चांगला पर्याय ठरू शकते.

Low Calorie Chicken Sandwich

|

Sakal

चिकन सँडविचसाठी साहित्य

हे सँडविच बनवण्यासाठी १२० ते १५० ग्रॅम चिकन ब्रेस्ट, २ ब्रेड स्लाइस, २ चमचे हंग कर्ड, कांदा, टोमॅटो, शिमला मिरची आणि आवश्यक मसाले घ्या.

Low Calorie Chicken Sandwich

| esakal

सर्वप्रथम चिकन शिजवून घ्या

एका भांड्यात पाणी उकळून त्यात मीठ आणि चिकन ब्रेस्ट घाला, त्यानंतर चिकन पूर्णपणे शिजेपर्यंत उकळून घ्या.

Low Calorie Chicken Sandwich

| Sakal

तयार करा क्रीमी चिकन फिलिंग

शिजवलेल्या चिकनचे बारीक धागे करून त्यात हंग कर्ड, चिरलेल्या भाज्या, काळी मिरी, चिली फ्लेक्स, ऑरेगॅनो आणि मीठ मिसळा.

Low Calorie Chicken Sandwich

|

Sakal

ब्रेड स्लाइस टोस्ट करा

तव्यावर थोडेसे ऑलिव्ह ऑइल किंवा तूप लावून मल्टिग्रेन किंवा होल व्हीट ब्रेडच्या दोन्ही स्लाइस हलक्या कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.

Low Calorie Chicken Sandwich

|

Sakal

अशा प्रकारे बनवा सँडविच

एका ब्रेड स्लाइसवर लेट्यूस, टोमॅटोचे काप आणि तयार चिकन फिलिंग ठेवा, त्यावर दुसरा ब्रेड स्लाइस ठेवून सँडविच मधून कापून घ्या.

Low Calorie Chicken Sandwich

|

Sakal

मिळेल भरपूर प्रोटीन!

एका सँडविचमधून अंदाजे ३३५ ते ३५० कॅलरीज आणि ३६ ते ४० ग्रॅम प्रोटीन मिळू शकते, मात्र प्रत्यक्ष पोषणमूल्य वापरलेल्या साहित्याच्या प्रमाणानुसार बदलू शकते.

Low Calorie Chicken Sandwich

|

Sakal

हिवाळ्यात मटण खावे का? काय सांगते आयुर्वेद?

Eating Mutton in Winter

|

Sakal

येथे क्लिक करा