बाळकृष्ण मधाळे
नोकरीतील ताण, मर्यादित पगारवाढ आणि प्रगतीच्या कमी संधींमुळे अनेकजण व्यवसायाचा पर्याय निवडत आहेत. व्यवसायासाठी मोठे भांडवल आवश्यक असते, असा समज असला तरी काही व्यवसाय ५० हजार रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीत सुरू करता येतात.
Best Business Ideas Under ₹50,000
esakal
खाद्यपदार्थ, रिटेल आणि शिक्षण क्षेत्रातील काही फ्रँचायझी कमी गुंतवणुकीत सुरू करता येतात. प्रस्थापित ब्रँडचे नाव, प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळत असल्याने सुरुवातीचा प्रवास तुलनेने सोपा होऊ शकतो. मात्र, फ्रँचायझी फी, रॉयल्टी आणि कराराच्या अटी आधी तपासणे आवश्यक आहे.
Best Business Ideas Under ₹50,000
esakal
कोडिंगचे ज्ञान असल्यास वेब डेव्हलपमेंट, ॲप डेव्हलपमेंट आणि वेबसाइट डिझाइनच्या सेवा देता येतात. लॅपटॉप, इंटरनेट आणि आवश्यक सॉफ्टवेअरच्या मदतीने घरातूनही काम सुरू करता येते.
Best Business Ideas Under ₹50,000
esakal
फोटोग्राफीची आवड असल्यास कॅमेरा, लेन्स आणि एडिटिंग सॉफ्टवेअरच्या मदतीने लग्नसोहळे, वाढदिवस, कार्यक्रम आणि प्री-वेडिंग शूटची कामे घेता येतात. ग्राहक वाढल्यानंतर व्यवसायात टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करता येते.
Best Business Ideas Under ₹50,000
esakal
चांगला स्वयंपाक करता येत असल्यास घरातून टिफिन सेवा सुरू करता येते. कच्चा माल, पॅकेजिंग आणि डिलिव्हरीचा खर्च हा सुरुवातीचा प्रमुख खर्च असतो. विद्यार्थी आणि ऑफिस कर्मचाऱ्यांना लक्ष्य करून ग्राहकवर्ग तयार करता येतो.
Best Business Ideas Under ₹50,000
esakal
एखाद्या विषयावर चांगले प्रभुत्व असल्यास ऑनलाइन किंवा ऑफलाइन ट्युशन सुरू करता येते. गणित, विज्ञान, इंग्रजी तसेच स्पर्धा परीक्षांचे वर्ग घेऊन कमी खर्चात उत्पन्नाचा स्रोत निर्माण करता येतो.
Best Business Ideas Under ₹50,000
esakal
ग्राफिक डिझाइन, कंटेंट रायटिंग, व्हिडिओ एडिटिंग आणि सोशल मीडिया मॅनेजमेंट यांसारखी कौशल्ये असल्यास फ्रीलान्सिंग करता येते. लॅपटॉप आणि इंटरनेटच्या मदतीने घरबसल्या कंपन्या किंवा स्थानिक व्यावसायिकांसाठी काम मिळवता येते.
Best Business Ideas Under ₹50,000
esakal
व्यवसायाला ग्राहक मिळवण्यासाठी फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲपचा प्रभावी वापर करता येतो. सेवा, उत्पादनांचे फोटो, ऑफर्स आणि ग्राहकांचे अनुभव शेअर करून कमी खर्चात स्थानिक ग्राहकांपर्यंत पोहोचता येते.
Best Business Ideas Under ₹50,000
esakal
कमी गुंतवणूक म्हणजे हमखास नफा असे नाही. व्यवसाय सुरू करण्यापूर्वी बाजारपेठेची मागणी, स्पर्धा, ग्राहकवर्ग, खर्च, आवश्यक परवाने आणि संभाव्य नफा यांचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. योग्य नियोजन आणि सातत्याने छोट्या व्यवसायाचा विस्तार करता येऊ शकतो.
Best Business Ideas Under ₹50,000
esakal
Kas Plateau flower season 2026
esakal