रक्तातील ऑक्सिजन लेव्हल कमी होण्याची 'ही' आहेत लक्षणे!

Aarti Badade

शरीरासाठी ऑक्सिजनचे महत्त्व

शरीराचे सर्व अवयव सुरळीत चालण्यासाठी रक्तातील ऑक्सिजनची पातळी (SPO2) योग्य असणे अत्यंत गरजेचे आहे.

Low oxygen symptoms

|

sakal

सतत थकवा जाणवणे

अगदी थोडेसे काम केल्यावरही प्रचंड थकवा किंवा अशक्तपणा जाणवणे हे शरीरातील ऑक्सिजन कमी झाल्याचे मुख्य संकेत आहे.

Low oxygen symptoms

|

Sakal

सायनोसिस : ओठ आणि नखे निळी पडणे

ऑक्सिजनची तीव्र कमतरता भासल्यास ओठ, त्वचा किंवा नखे निळसर पडू शकतात, या वैद्यकीय स्थितीला 'सायनोसिस' म्हणतात.

Low oxygen symptoms

|

Sakal

हृदयाच्या ठोक्यांची गती वाढणे

शरीरातील ऑक्सिजनची कमतरता भरून काढण्यासाठी हृदय अधिक वेगाने रक्त पंप करू लागते, ज्यामुळे हृदयाचे ठोके वाढतात.

Low oxygen symptoms

|

Sakal

चक्कर येणे आणि डोकेदुखी

मेंदूला पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्यामुळे वारंवार चक्कर येणे, गोंधळल्यासारखे वाटणे किंवा तीव्र डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.

Low oxygen symptoms

|

Sakal

श्वास घेण्यास त्रास आणि खोकला

श्वास घेताना अडथळा येणे किंवा वारंवार खोकला येणे हे फुफ्फुसांपर्यंत पुरेसा ऑक्सिजन पोहोचत नसल्याचे लक्षण आहे.

Low oxygen symptoms

|

Sakal

ऑक्सिजन लेव्हल किती असावी?

सामान्यतः रक्तातील ऑक्सिजनची पातळी ९५% ते १००% असणे निरोगी मानले जाते; ती सतत ९४% पेक्षा कमी असणे चिंताजनक आहे.

Low oxygen symptoms

|

sakal

वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या

जर तुम्हाला वरीलपैकी कोणतीही लक्षणे जाणवत असतील, तर पल्स ऑक्सिमीटरने तपासणी करा आणि त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.

Low oxygen symptoms

|

Sakal

कोलेस्ट्रॉल कंट्रोल करायचंय? मग हृदयासाठी 'हा' एक पदार्थ ठरतो रामबाण!

eat garlic for cholesterol heart health

|

Sakal

येथे क्लिक करा