Aarti Badade
लसूण फक्त जेवणाची चव वाढवत नाही, तर त्याच्या आरोग्यवर्धक फायद्यांमुळे तो शरीरासाठी खूप उपयोगी आहे.
संशोधनाने दाखवले आहे की लसूणाच्या सेवनाने रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.
लसूण मधुमेह व्यवस्थापनासाठी खूप उपयुक्त आहे, कारण यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते.
लसूण कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करतो, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि धमन्यांमध्ये प्लेक निर्माण होण्याचा धोका कमी होतो.
दररोज सकाळी दोन लसूण पाकळ्या कोमट पाण्यात धुऊन चावून घेतल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते.
कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी रिकाम्या पोटी लसूणाच्या पाकळ्यांचे सेवन फायदेशीर ठरू शकते.
आरोग्याच्या सर्व समस्या होतील दूर पण कोणताही उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.