Aarti Badade
पावसाळ्यात सर्दी, ताप आणि विषाणूजन्य संसर्गापासून वाचण्यासाठी आहारात योग्य बदल करणे आवश्यक आहे.
संत्रा, हिरवे सफरचंद आणि गाजरांचा रस शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीला वाढवण्यासाठी उत्तम आहे. याचे सेवन व्हिटॅमिन B6 आणि बीटा कॅरोटीनचे प्रमाण सुधारते.
भाज्यांचा सूप पिऊन शरीराला जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने आणि अँटीऑक्सिडंट्स मिळवता येतात, ज्यामुळे पावसाळ्यात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहते.
पावसाळ्यात कोमट किंवा उकळलेले पाणी पिण्याने शरीराची इम्यूनिटी वाढते आणि सर्दी, खोकला व विषाणूजन्य संसर्गापासून संरक्षण मिळते.
मूग डाळ खाणे पावसाळ्यात खूप फायदेशीर आहे. हे पचायला सोपे असते आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.
आल्याचे सेवन पावसाळ्यात आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. यामुळे इम्यूनिटी वाढते आणि हंगामी आजारांपासून संरक्षण मिळते.
पावसाळ्यात आहारात सूप आणि मसालेदार पदार्थांची भर घालून शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत केली जाऊ शकते.
योग आणि व्यायामामुळे शरीराच्या प्रतिकारशक्तीला चालना मिळते, त्यामुळे पावसाळ्यात शरीराला निरोगी ठेवण्यास मदत मिळते.