gas cylinder home delivery rules वरच्या मजल्यावर आहे सांगून सिलिंडर डिलिव्हरीला एक्स्ट्रा पैसे मागतायत? नियम काय आहे?

सूरज यादव

वाहतूक खर्च

घरगुती गॅस सिलिंडर घरापर्यंत आणून देणाऱ्या डिलिव्हरी कर्मचाऱ्यांकडून अतिरिक्त पैशांसाठी अगदी तगादा लावला जातो.

Gas Cylinder Delivery

|

Esakal

नियमबाह्य

अतिरिक्त पैसे मागणं हे पूर्णतः नियमबाह्य असून या प्रकाराची तक्रार करण्यासाठी टोल फ्री हेल्पलाइनही आहे.

Gas Cylinder Delivery

|

Esakal

अतिरिक्त मागणी

मजले जास्त असल्याचे किंवा जिने चढून यावे लागत असल्याचे कारण पुढे करत काही डिलिव्हरी कर्मचारी २० ते ५० रुपयांपर्यंत अतिरिक्त मागणी करतात.

Gas Cylinder Delivery

|

Esakal

खर्च आधीच वसूल

सिलिंडरच्या किमतीतच घरापर्यंतच्या वाहतुकीचा आणि डिलिव्हरीचा खर्च आधीच समाविष्ट असतो, त्यामुळे वेगळे परिवहन शुल्क आकारण्यास मनाई आहे.

Gas Cylinder Delivery

|

Esakal

जबाबदारी

पेट्रोलियम कंपन्यांच्या नियमांनुसार ग्राहक कोणत्याही मजल्यावर राहत असला तरी सिलिंडर त्याच्या घरातील किचनपर्यंत पोहोचवणे ही डिलिव्हरी कर्मचाऱ्याची कायदेशीर जबाबदारी आहे.

Gas Cylinder Delivery

|

Esakal

टीप ऐच्छिक

अनेकदा ग्राहक विशेषतः गृहिणी वाद टाळण्यासाठी किंवा माहितीअभावी ही अतिरिक्त रक्कम देतात. मात्र, टीप देणे ही पूर्णपणे ऐच्छिक बाब असून ती जबरदस्तीने मागणे किंवा त्यासाठी ग्राहकावर दबाव आणणे नियमाच्या विरोधात आहे.

Gas Cylinder Delivery

|

Esakal

जाब विचारा

ग्राहकांनी केवळ गॅसच्या पावतीवर नमूद केलेली अधिकृत रक्कमच द्यावी आणि कर्मचारी अधिक पैशांची मागणी करीत असेल तर तत्काळ संबंधित गॅस एजन्सीकडे जाब विचारला पाहिजे.

Gas Cylinder Delivery

|

Esakal

Gas Cylinder Deliveryतक्रार

तक्रारीसाठी ग्राहक १८००-२३३-३५५५ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकतात.याशिवाय पेट्रोलियम कंपन्यांच्या अधिकृत संकेतस्थळांवर मोबाइल अॅपद्वारे किंवा एजन्सीमधील तक्रार पुस्तिकेत नोंद करता येते.

Gas Cylinder Delivery

|

Esakal

आमदारकीची निवडणूक लढवायला किती खर्च येतो?

Cost of Contesting an MLA Election

|

ESakal

इथं क्लिक करा