गॅस कनेक्शन सोबत मोफत मिळतो तब्बल 'इतक्या' लाखांचा विमा, कसा कराल दावा ?

Yashwant Kshirsagar

एलपीजीचा वापर

भारतातील बहुतेक घरांमध्ये आता एलपीजीचा वापर केला जातो.एलपीजी सिलिंडरची उपलब्धता ग्रामीण भागापासून शहरी भागात वाढली आहे.

Free LPG Insurance

|

esakal

विमा संरक्षण

ग्राहकांना गॅस कनेक्शनसह लाखो रुपयांचे मोफत विमा संरक्षण देखील मिळते हे फार कमी लोकांना माहिती आहे.

Free LPG Insurance

|

esakal

आर्थिक सुरक्षा

अपघात झाल्यास त्यांच्या कुटुंबांना आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी हा विमा प्रदान केला जातो.

Free LPG Insurance

|

esakal

आपोआप विमा संरक्षण

जेव्हा नवीन गॅस कनेक्शन खरेदी केले जाते किंवा जुने नूतनीकरण केले जाते तेव्हा ग्राहकांना आपोआप निश्चित विमा संरक्षण मिळते. वेगळा फॉर्म भरण्याची किंवा प्रीमियम भरण्याची आवश्यकता नाही.

Free LPG Insurance

|

esakal

अपघात

हा विमा गॅस गळती, आग किंवा सिलिंडर स्फोट यासारख्या अपघातांमध्ये झालेल्या नुकसानाचे संरक्षण करतो.

Free LPG Insurance

|

esakal

कुटुंबाला लाभ

गॅस कनेक्शन खरेदी केल्यावर यामध्ये कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी १० लाखांपर्यंतचे संरक्षण आहे तर संपूर्ण कुटुंबासाठी जास्तीत जास्त ५० लाखांचे संरक्षण आहे.

Free LPG Insurance

|

esakal

मालमत्ता नुकसान

मालमत्तेचे नुकसान झाल्यास २ लाखांपर्यंतचे दावे करता येतात. मृत्यू झाल्यास ६ लाखांपर्यंतचा वैयक्तिक अपघात विमा उपलब्ध आहे.

Free LPG Insurance

|

esakal

वैद्यकीय उपचार

शिवाय,वैद्यकीय उपचारांसाठी जास्तीत जास्त ३० लाखांपर्यंतची तरतूद आहे, ज्यामध्ये प्रत्येक सदस्यासाठी जास्तीत जास्त २ लाखांपर्यंतची तरतूद आहे.

Free LPG Insurance

|

esakal

नियम

ही विमा रक्कम थेट कुटुंबाला दिली जाते, परंतु त्यासाठी गॅस सिलिंडर, रेग्युलेटर, पाईप आणि स्टोव्ह आयएसआय-मार्क केलेले असणे आवश्यक आहे आणि त्यांची वेळोवेळी तपासणी करणे आवश्यक आहे.

Free LPG Insurance

|

esakal

कोणत्या अटी ?

आवश्यक नियमांचे पालन करणारे ग्राहकच गॅस विमा कव्हरचा लाभ घेऊ शकतात. उदाहरणार्थ, गॅस सिलिंडर पाईप, स्टोव्ह आणि रेग्युलेटर आयएसआय-मार्क केलेले असणे आवश्यक आहे.

Free LPG Insurance

|

esakal

दावा करण्याची प्रक्रिया

जर गॅस सिलेंडरमुळे अपघात झाला आणि तुम्हाला विम्याचा दावा करायचा असेल, तर प्रथम तुमच्या एलपीजी वितरकाला आणि पोलिस स्टेशनला अपघाताची माहिती द्या.

Free LPG Insurance

|

esakal

ग्राऊंड रिपोर्ट

त्यानंतर विमा कंपनीचा अधिकारी ग्राउंड व्हिजिट घेईल आणि चौकशी करेल.अपघाताची पुष्टी झाल्यानंतर, विमा कंपनी दावा मंजूर करते.

Free LPG Insurance

|

esakal

ऑनलाईन सुविधा

ग्राहकांना वेगळा अर्ज सादर करण्याची आवश्यकता नाही. वितरक प्रक्रिया सुरू करतो. हा विमा दावा mylpg.in या वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन देखील दाखल करता येतो.

Free LPG Insurance

|

esakal

पुण्याजवळील 'या' ५ ठिकाणांवरुन दिसतात सुंदर ग्रह-तारे; मिळेल स्वर्गसुखाचा अनुभव

Pune's Best Stargazing Points

|

esakal

येथे क्लिक करा