Vinod Dengale
इराण-अमेरिका-इस्रायल तणावामुळे तेल आणि गॅस संकट वाढले आहे. याचा परिणाम भारतातील LPG पुरवठ्यावरही दिसू लागला आहे.
गॅस मिळण्यात अडचणी येत असल्यामुळे अनेक जण आता इलेक्ट्रिक प्रेशर कुकर आणि राईस कुकर खरेदी करत आहेत.
या कुकरमध्ये भात, बिर्याणी, भाज्या, सूप, मांसाहारी पदार्थ आणि इडलीसुद्धा सहज बनवता येतात.
फक्त पदार्थ कुकरमध्ये टाका, प्लग इन करा आणि स्विच ऑन करा. काही मिनिटांत स्वयंपाक तयार.
इलेक्ट्रिक कुकरमध्ये कंट्रोल पॅनेल असते. त्यातून तापमान आणि कुकिंग मोड सहज निवडता येतो.
इलेक्ट्रिक प्रेशर कुकरची सुरुवातीची किंमत साधारण 1499 रुपयांपासून सुरू होते.
गॅसची टंचाई वाढत असताना इलेक्ट्रिक कुकर अनेक घरांसाठी किचनमधील सोपा आणि स्मार्ट पर्याय बनत आहे.
LPG Cylinder
Esakal