Rishabh Pant महागात पडला; प्रत्येक धावेची किंमत ऐकून हदरून जाल

Pranali Kodre

लखनौ सुपर जायंट्सचा पराभव

आयपीएल २०२५ स्पर्धेत रिषभ पंतच्या नेतृत्वात खेळणाऱ्या लखनौ सुपर जायंट्स संघाला १९ मे रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ६ विकेट्सने पराभवाचा धक्का बसला.

Rishabh Pant | Sakal

प्लेऑफ शर्यतीतून बाद

हा लखनौचा १२ सामन्यातील ७ वा पराभव ठरला. त्यांचे आता साखळी फेरीतील २ सामनेच बाकी असल्याने ते प्लेऑफच्या शर्यतीतून बाद झाले.

Rishabh Pant | Sakal

अपेक्षाभंग

लखनौला यंदाच्या हंगामात नवा कर्णधार रिषभ पंतच्या खराब कामगिरीचाही फटका बसला. रिषभला अपेक्षेनुसार फारशी कामगिरी करता आली नाही.

Rishabh Pant | Sakal

पंतच्या धावा

रिषभ पंतने १२ सामन्यांतील ११ डावात १३५ धावा केल्या. त्यात एकाच अर्धशतकाचा समावेश आहे.

Rishabh Pant | Sakal

पंतची किंमत

रिषभ पंतला लखनौ सुपर जायंट्सने आयपीएल लिलावात २७ कोटी रुपयांना खरेदी केले होते.

Rishabh Pant | Sakal

प्रत्येक धावेची किंमत

या किंमतीचा आणि त्याने या हंगामात पहिल्या १२ सामन्यात केलेल्या १३५ धावांचा विचार केला, तर त्याची एका धावेची सरासरी किंमत तब्बल २० लाख रुपये होते.

Rishabh Pant | Sakal

महागडा खेळाडू

ही किंमत पाहाता रिषभ पंत लखनौसाठी महागडा ठरल्याचे दिसत आहे.

Rishabh Pant | Sakal

अपेक्षा

आता लखनौला अद्याप २ साखळी सामने खेळायचे असल्याने त्यात पंत चांगली कामगिरी करेल, ही अपेक्षा त्याच्या चाहत्यांना आणि संघालाही असेल.

Rishabh Pant | Sakal

LSG च्या भरवशावर राहिला अन् लग्नाला मुकला! लखनौच्या 'पोस्टर बॉय'ची चर्चा

LSG vs SRH Fan Poster | Sakal
येथे क्लिक करा