बाळकृष्ण मधाळे
शिलाजीत हे शरीराची ताकद वाढवणारे एक प्रभावी औषध मानले जाते. मात्र, शिलाजीतपेक्षाही अधिक शक्तिशाली असे एक नैसर्गिक फळ आहे, जे शरीराला भरपूर ऊर्जा देण्यास मदत करते.
Super Energy Fruit
esakal
आपण ज्या फळाबद्दल बोलत आहोत ते म्हणजे लुकुमा. लुकुमाचे शास्त्रीय नाव लुकुमा कॅम्पेचियाना असून, याला एगफ्रूट असेही म्हटले जाते. हे फळ सपोटा कुटुंबातील आहे.
Super Energy Fruit
esakal
लुकुमा फळात पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन सी यांसारखी महत्त्वाची पोषकद्रव्ये मुबलक प्रमाणात आढळतात.
Super Energy Fruit
esakal
यासोबतच फायबर आणि कार्बोहायड्रेट्सही मोठ्या प्रमाणात असल्यामुळे हे फळ शरीराला शक्ती आणि सुपर एनर्जी प्रदान करते. लुकुमा खाल्ल्याने दिवसभर शरीर सक्रिय आणि उत्साही राहण्यास मदत होते.
Super Energy Fruit
esakal
या फळामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास उपयुक्त ठरतात.
Super Energy Fruit
esakal
लुकुमामध्ये आढळणारे कॅरोटीनॉइड्स आतड्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असून मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासही मदत करतात.
Super Energy Fruit
esakal
एकूणच, नैसर्गिक पद्धतीने ऊर्जा वाढवण्यासाठी आणि आरोग्य सुधारण्यासाठी लुकुमा हे एक अत्यंत प्रभावी फळ मानले जाते.
Super Energy Fruit
esakal
Lotus National Flower
esakal