चंद्रग्रहणादरम्यान कोणते उपाय करावेत?

Monika Shinde

चंद्रग्रहणादरम्यान शांत रहा

ग्रहणाच्या काळात मानसिक शांतता महत्त्वाची आहे. घाबरू नका, सकारात्मक विचार करा आणि मनाला स्थिर ठेवण्यासाठी ध्यान किंवा प्राणायाम करा.

ग्रहण काळात अन्नपान टाळा

चंद्रग्रहणाच्या वेळेस अन्न-धारणा टाळावी. ग्रहण संपल्यानंतरच जेवण करावे. यामुळे शरीरावर नकारात्मक परिणाम होणार नाही.

ग्रहणात दान करा

ग्रहणाच्या वेळी दान केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते. गरजूंना अन्न, वस्त्र किंवा इतर मदत करा. हे पुण्यकारक मानले जाते.

धूप, दीप लावा

ग्रहणाच्या काळात घरात धूप किंवा दीप लावल्याने नकारात्मक शक्ती दूर होतात. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते.

मंत्रजप करा

ग्रहणाच्या वेळी “ॐ” किंवा आपले आवडते मंत्र जपल्यास मानसिक स्थिरता येते आणि नकारात्मक प्रभाव कमी होतो.

ग्रहणानंतर स्नान करा

ग्रहण संपल्यानंतर पवित्र पाण्याने स्नान केल्यास शरीरातील नकारात्मकता निघून जाते, आणि नवीन ऊर्जा प्राप्त होते.

घरातील खिडक्या- दरवाजे बंद ठेवा

ग्रहणाच्या काळात घरातील खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवल्याने घरात नकारात्मक उर्जा प्रवेश होण्यापासून बचाव होतो.

ग्रहणानंतर पूजाअर्चा करा

ग्रहण संपल्यानंतर पूजा-अर्चा किंवा धार्मिक विधी करणे शुभ असते, यामुळे घरातील वातावरण शुध्द होते आणि सुख-शांती वाढते

भारतातील सर्वात कठीण परीक्षा कोणत्या? टॉप १० यादी येथे वाचा!

येथे क्लिक करा