Monika Shinde
ही परीक्षा देशातील सर्वोच्च प्रशासनिक पदांवर काम करण्यासाठी घेतली जाते, जसे की IAS, IPS, आणि IFS. लाखो विद्यार्थी ही परीक्षा देतात, पण निवड होणाऱ्यांची संख्या फारच कमी असल्यामुळे ती अतिशय कठीण मानली जाते.
डॉक्टर होण्यासाठी NEET परीक्षा देणं अनिवार्य आहे. देशभरातून लाखो विद्यार्थी या परीक्षेला बसतात, पण मेडिकल कॉलेजांमध्ये जागा मर्यादित असल्यामुळे स्पर्धा फारच तीव्र असते.
भारताच्या सर्वोच्च अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रवेशासाठी JEE Advanced परीक्षा खूपच कठीण आहे. गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रात उत्तम ज्ञान आवश्यक असते.
ही कॉमर्स क्षेत्रातील सर्वात कठीण व्यावसायिक परीक्षा आहे. अकाउंटिंग, फायनान्स, कर आणि कायद्याचा सखोल अभ्यास या परीक्षेसाठी करावा लागतो.
MBA कॉलेजांमध्ये प्रवेशासाठी घेतली जाणारी CAT परीक्षा बुद्धिमत्ता, वेळ व्यवस्थापन आणि तर्कशक्ती यांचा संगम आहे. यश मिळवणं फार कठीण असतं.
भारतीय सैन्य, नौदल आणि हवाई दलासाठी अधिकारी पदांवर भरतीसाठी घेतल्या जाणाऱ्या या परीक्षांमध्ये शारीरिक, मानसिक आणि तांत्रिक कसोटी घेतली जाते.
एमटेक अभ्यासक्रमासाठी आणि सरकारी कंपन्यांमध्ये नोकरीसाठी दिली जाणारी ही परीक्षा तांत्रिक ज्ञान आणि कौशल्यावर आधारित असते.
राष्ट्रीय कायदा विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी घेतली जाणारी CLAT परीक्षा कायद्याचे सखोल ज्ञान तपासते. जागा कमी असल्यामुळे स्पर्धा मोठी असते.
न्यायालयीन अधिकारी किंवा न्यायाधीश बनण्यासाठी ही परीक्षा दिली जाते. यशस्वी होण्यासाठी कायद्याचा सखोल अभ्यास आणि न्यायप्रक्रियेची माहिती आवश्यक आहे.
केंद्र सरकारच्या विविध कार्यालयांत भरतीसाठी घेतल्या जाणाऱ्या SSC CGL, CHSL सारख्या परीक्षांना लाखो उमेदवार बसतात, पण निवड होणाऱ्यांची संख्या फारच कमी असते.