साताऱ्यातल्या 'या' नदीचा हिसका बसला अन् औरंगजेब कायमचा झाला लंगडा, नेमकी स्टोरी काय?

Saisimran Ghashi

माण नदीचा इतिहास

माण नदी ही सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील कळस्करवाडीत उगम पावते आणि पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे भिमा नदीला जाऊन मिळते. तिचा 180 किलोमीटरचा प्रवास आहे आणि ती ४२ ओहोळ आणि ओढ्यांमध्ये आपला मार्ग घेते.

maan ganga river flood impact on aurangzeb | esakal

दुष्काळात नदीचे अस्तित्व

माण नदी, जी मराठवाड्याच्या पर्जन्यछायेतून जाते आणि म्हसवडसारख्या कमी पाऊस पडणाऱ्या भागातून वाहते, त्याला कधीच पूर आलेला नव्हता. तो एक प्रकारे “कोरडी ठणठणीत नदी” म्हणून ओळखली जात होती.

maan ganga river flood impact on aurangzeb | esakal

दोन दिवसांचा पाऊस

२ दिवसांच्या पाऊसामुळे कधीच पूर न अनुभवलेल्या माण नदीला अचानक महापूर आला. यामुळे माणगंगेच्या रौद्र रूपाने किमान तीन जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण केली.

maan ganga river flood impact on aurangzeb | esakal

दुष्काळी भागात महापूराचा अनुभव

सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील लोकांना जेव्हा माणगंगेचा पूर अनुभवायला मिळाला, तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. ही घटना त्या भागात कल्पनेच्या पलीकडे होती.

maan ganga river flood impact on aurangzeb | esakal

औरंगजेबाचा कालावधी

सुमारे तीनशे वर्षांपूर्वी जेव्हाऔरंगजेब मराठा स्वराज्य काबीज करण्यासाठी येत होता, तोच काळ होता जेव्हा माण नदीला महापूर आला. आणि यामुळे त्याच्या मोहिमेला मोठा धक्का बसला.

maan ganga river flood impact on aurangzeb | esakal

महापूराच्या ऐतिहासिक नोंदी

मुघल अखबार, मुस्तैदखान आणि खाफिखान यांच्याकडून या महापूराच्या नोंदी घेतल्या गेल्या. प्रसिद्ध इतिहासकार सेतू माधवराव पगडी यांनी त्यांचे भाषांतर केले.

maan ganga river flood impact on aurangzeb | esakal

औरंगजेबाचा संघर्ष

१७०० मध्ये औरंगजेबाने सातारा जिंकले आणि मिरजेकडे निघाला. त्याच्या सोबत शाही लवाजमा होता, ज्यात हत्ती, घोडे, उंट आणि शाही सामान होते. त्याच वेळी माण नदीला महापूर आला.

maan ganga river flood impact on aurangzeb | esakal

महापूरात छावणी गेली वाहून

माण नदीच्या महापूरात औरंगजेबाच्या छावण्या वाहून गेल्या आणि त्याच्या एकूण सैनिकांच्या लवाजमाला प्रचंड नुकसान झाले. औरंगजेब देखील या पुराच्या पाण्यात अडकला.

maan ganga river flood impact on aurangzeb | esakal

औरंगजेबाचा अपघात

महापूरामुळे औरंगजेबाला पूराच्या पाण्यात बुडण्यापासून वाचताना त्याचा पाय मोडला. या घटनेने त्याला कायमचे अपंगत्व दिले. त्याच्या जीवनातील हे एक धक्कादायक वळण होते.

maan ganga river flood impact on aurangzeb | esakal

इतिहासातील महापूराची पुनरावृत्ती

दोन वर्षांनी, माण नदीला पुन्हा महापूर आला, ज्यामुळे औरंगजेब दुसऱ्यांदा पूरात अडकला होता. यावेळी, तो विशाळगड ते कराड मार्गावर अडकला होता.

maan ganga river flood impact on aurangzeb | esakal

कसे दिसायचे बाजीराव पेशवे? अस्सल दुर्मिळ छायाचित्रे बघाच

Peshwa Bajirao Real Photos | esakal
येथे क्लिक करा