सकाळ डिजिटल टीम
उत्तर प्रदेशातील या गावाला यूपीएससीचा कारखाना म्हटले जाते.चला तर मग या गावाबद्दल जाणून घेऊया...
युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजेच यूपीएससीची परीक्षा ही जगातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते.
उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील हे गाव आहे. देशातील सर्वात जास्त आयएएस, आयपीएस आणि पीसीएस अधिकारी या गावातून बाहेर पडले आहेत.
या गावाचे नाव माधोपट्टी आहे. त्यामुळे या गावाला यूपीएससीचा कारखाना म्हणतात.
सुमारे 4000 लोकसंख्या असलेल्या या गावात 40 पेक्षा अधिक अधिकारी निर्माण झाले आहेत.
सुमारे 75 घरांच्या या गावातील अनेक आयएएस अधिकारी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्या कार्यालयात काम करत आहेत.
तसेच या गावातील अनेक तरुण इस्रो,होमी भाभा अणु संशोधन केंद्र आणि जागतिक बँकेसारख्या प्रतिष्ठित ठिकाणी काम करत आहेत.