Anuradha Vipat
अभिनेत्री प्रियांका चोप्राने 2018 मध्ये अमेरिकन गायक निक जोनासशी लग्न केलं आहे
प्रियांका सध्या 41 वर्षांची तर निक 31 वर्षांचा आहे.
आता प्रियांकाची आई मधू चोप्रा या नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या वयातील फरकाविषयी मोकळेपणे व्यक्त झाल्या आहेत.
मधू चोप्रा यांनी सांगितलं की प्रियांका आणि निक यांच्यातील वयातील फरक हा कुटुंबात कधी चर्चेचा विषयच बनला नाही
वयातील फरकापेक्षा अधिक महत्त्वाचं म्हणजे एकमेकांविषयी असणारी काळजी आणि आदर, असं पुढे त्या म्हणाल्या.
मधू चोप्रा पुढे म्हणाल्या, “आम्हाला त्यांच्या वयामुळे काहीच फरक पडला नाही.
प्रियांका आणि निकने 1 डिसेंबर 2018 रोजी ख्रिश्चन आणि हिंदू परंपरेनुसार लग्न केलं.