Anuradha Vipat
अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.
मधुराणीने सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये ती समुद्रातून प्रवास करीत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर तिने एका किल्ल्याला भेट दिल्याचे दिसत आहे.
अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने कुलाबा किल्ल्याला भेट दिल्यानंतर तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत मधुराणीने लिहिले आहे की, ‘कुलाबा किल्ल्याला’ भेट दिली आणि अक्षरशः भारावून गेले. तिथे किती काय काय आहे
मधुराणीने लिहिले आहे की,या किल्ल्याबद्दल मला अजून माहिती हवी होती; पण ती देऊ शकणारा गाईडसुद्धा तिथे नव्हता याची खंत वाटली. आपल्या महाराष्ट्रात किती अप्रतिम महत्त्वाची ऐतिहासिक पर्यटनस्थळं आहेत; पण त्याकडे का कुणी गांभीर्याने बघत नाहीये