Anuradha Vipat
अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे.
सध्या या चित्रपटातील ‘सूसेकी’ गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
आता बॉलीवूडच्या ‘धकधक गर्ल’ला सुद्धा या गाण्याची भुरळ पडली आहे.
माधुरी दीक्षितने नुकताच ‘पुष्पा २’ चित्रपटातील ‘सूसेकी’ गाण्यावर डान्स केला आहे
‘पुष्पा २’मधील सूसेकी आणि “एक लाजरान साजरा मुखडा” या गाण्याच्या मराठमोळ्या रिमिक्स व्हर्जनवर माधुरी थिरकली आहे.
हिंदी गाण्यावर माधुरीचा मराठमोळा तडका पाहून नेटकऱ्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
माधुरी दीक्षितच्या या व्हिडीओवर अवघ्या २४ तासांत ७० लाखांहून अधिक व्ह्यूज आले आहेत.