वयाच्या ५६ व्या वर्षी माधुरी सुंदर कशी दिसते? फॉलो करा तिचे स्किनकेअर रूटीन

Monika Lonkar –Kumbhar

माधुरी दीक्षित

बॉलिवूडची 'धकधक गर्ल' अभिनेत्री माधुरी दीक्षित.

उत्तम अभिनयासोबतच माधुरी तिच्या निखळ सौंदर्यासाठी आणि फिटनेससाठी खास ओळखली जाते.

स्किनकेअर रूटीन

वयाच्या ५६ व्या वर्षी ही माधुरी पूर्वीसारखीच सुंदर दिसते. तिच्या स्किनकेअरचे रूटीन तिने मध्यंतरी चाहत्यांसोबत शेअर केले होते. या स्किनकेअर रूटीनमध्ये कोणत्या गोष्टी आहेत? जाणून घेऊयात.

भरपूर पाणी प्या

स्किनकेअर रूटीनबद्दल बोलताना माधुरीने सांगितले की, त्वचेची काळजी घेण्यासाठी आहारासोबतच भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे.

तळलेल्या खाद्यपदार्थांपासून दूर रहा

माधुरीने सांगितले की, त्वचेच्या समस्यांवर मात करण्यासाठी तेलकट पदार्थ आणि गोड पदार्थांचे सेवन करणे टाळा. कारण अशा पदार्थांमुळे त्वचेवर पिंपल्स येतात.

हिरव्या पालेभाज्या आणि फळे

त्वचेला हेल्दी ठेवण्यासाठी तुमच्या आहारात हिरव्या पालेभाज्या आणि फळे यांचा जरूर समावेश करा. असा सल्ला माधुरीने दिला आहे.

व्यायाम महत्वाचा

निरोगी त्वचेसाठी व्यायाम अतिशय महत्वाचा आहे. व्यायामामुळे त्वचेतील रक्ताभिसरण वाढते अन् त्याचबरोबर त्वचेवर चमकही वाढते.

पुरेशी झोप

माधुरीने सांगितले की, त्वचा निरोगी ठेवण्यासाठी झोपही महत्त्वाची आहे. कमी झोपेमुळे चिडचिडेपणासह त्वचेची चमकही कमी होते. अशा स्थितीत दिवसातून ७ ते ८ तास झोप घेण्याचा प्रयत्न करा.

गुढीपाडव्यानिमित्त 'आई कुठे काय करते' फेम ईशाचा मराठमोळा अंदाज

Apurva Gore | esakal