माधुरीची वनतारामध्ये कशी आहे दिनचर्या? पाहा खास फोटो

Yashwant Kshirsagar

स्वाक्षरी मोहीम

माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी 2 लाख 4 हजार 421 जणांनी पाठिंबा दिला आहे. गेल्या दोन दिवसांपासून ही स्वाक्षरी मोहीम सुरू आहे.

Madhuri Elephant Daily Routine vantara | esakal

दिनचर्या

माधुरीची वनतारामध्ये नीट देखभाल होईल की नाही याची सर्वांना काळजी लागली आहे. दरम्यान वनतारा ने माधुरीच्या दिनचर्येचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Madhuri Elephant Daily Routine vantara | esakal

आंघोळ

माधुरी हत्तीणीला आंघोळ घालतानेचे फोटो वनतारा ने इंस्टाग्राम वर शेअर केले आहेत.

Madhuri Elephant Daily Routine vantara | esakal

पायाची जखम

माधुरीच्या पायाची जखम बरी करण्यासाठी काय काळजी घेतली जात आहे? याचा देखील फोटो शेअर केला आहे.

Madhuri Elephant Daily Routine vantara | esakal

आनंदी

माधुरी आपल्या सोंडेने पाणी उडवित असल्याचे फोटो शेअर करत ती आनंदी असल्याचे सूचित करण्यात आले आहे.

Madhuri Elephant Daily Routine vantara | esakal

माधुरीचे आरोग्य

माधुरी हिच्या आरोग्याचे आणि दीर्घकालीन कल्याणाचे रक्षण करणे हाच आमचा एकमेव हेतु राहिला आहे, असे वनताराने म्हटले आहे.

Madhuri Elephant Daily Routine vantara | esakal

मुक्त संचार

माधुरी वनतारामध्ये मुक्त संचार करत असल्याचे फोटोमध्ये दिसत आहे.

Madhuri Elephant Daily Routine vantara | esakal

माधुरीचे खाद्य

माधुरीला खाद्यातमध्ये काय काय दिले जाते याचाही फोटो वनताराच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

Madhuri Elephant Daily Routine vantara | esakal

मुक्या प्राण्यांची सेवा

वनतारा कोणत्याही धर्म, प्रदेश किंवा परंपरेच्या विरोधात नाही. आम्ही अशा मुक्या जीवांच्या सेवेसाठी आहोत, जे मानवी करुणेवर अवलंबून आहेत. आम्ही पारदर्शकतेस कायद्याच्या पालनास आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे करुणेला पूर्णपणे वचनबद्ध आहोत. असे वनताराकडून सांगण्यात आले आहे.

Madhuri Elephant Daily Routine vantara | esakal

जनतेला आवाहन

आम्ही जनतेला संघर्षासाठी नाही तर माधुरी व अशा प्रत्येक प्राण्याच्या सन्मानपूर्वक व शांत आयुष्याच्या अधिकारासाठी आमच्या सोबत उभे राहण्याचे विनम्र आवाहन करतो. असे वनताराने म्हटले आहे.

Madhuri Elephant Daily Routine vantara | esakal

शंभर आजारांवर गुणकारी आहे 'हे' दुर्मिळ फळ; पानांचेही आहेत खूप फायदे

Lasoda Fruit Benefits | esakal
येथे क्लिक करा