Yashwant Kshirsagar
अरुणाचल प्रदेशातील हे अतिप्रसिद्ध सरोवर मूळचे 'सांगेत्सर सरोवर' नावाने ओळखले जाते. मात्र आजकाल बहुतेक लोक याला माधुरी सरोवर म्हणूनच ओळखतात
Madhuri Lake Arunachal Pradesh
esakal
बॉलिवूड चित्रपट कोयला मधील प्रसिद्ध गाणे 'तन्हाई-तन्हाई' याच सरोवराच्या किनाऱ्यावर चित्रित करण्यात आले होते. गाण्याच्या यशानंतर हे ठिकाण 'माधुरी सरोवर' म्हणून प्रसिद्ध झाले.
Madhuri Lake Arunachal Pradesh
esakal
टेकड्यांच्या कुशीत वसलेले हे सरोवर इतके नयनरम्य आहे की इथे पोहोचल्यावर तुम्हाला वाटेल की तुम्ही पूर्णपणे वेगळ्या जगात आहात.
Madhuri Lake Arunachal Pradesh
esakal
समुद्रसपाटीपासून सुमारे १५,२०० फूट उंचीवर असलेले माधुरी सरोवर थंड हवामान आणि शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहे.
Madhuri Lake Arunachal Pradesh
esakal
बर्फाच्छादित पर्वत, थंडगार झुळूक आणि अतिशय शांतता... इथला प्रत्येक क्षण अविस्मरणीय आठवण ठेवतो.
Madhuri Lake Arunachal Pradesh
esakal
सरोवराभोवती पाइन वृक्षांची घनदाट जंगले आणि भव्य पर्वत यामुळे इथे शहराच्या गोंगाटापासून पूर्ण मुक्ती मिळते.
Madhuri Lake Arunachal Pradesh
esakal
सरोवरात उभे असलेले सुकलेले वृक्ष आणि पार्श्वभूमीतील बर्फाच्छादित पर्वत... इथले दृश्य फोटोसाठी अगदी परफेक्ट आहेत.
Madhuri Lake Arunachal Pradesh
esakal
तवांग शहरातून बूम ला रोड मार्गे सुमारे ३६ किलोमीटर अंतर कापल्यावर तुम्ही माधुरी सरोवरापर्यंत पोहोचू शकता.
Madhuri Lake Arunachal Pradesh
esakal
भारत-चीन सीमेजवळ असल्याने इथे येण्यासाठी परवाना घेणे अनिवार्य आहे. भारतीय पर्यटक जिल्हा आयुक्त कार्यालयातून परवानगी घेऊ शकतात.
Madhuri Lake Arunachal Pradesh
esakal
परदेशी पर्यटकांना माधुरी सरोवराला भेट देण्याची परवानगी नाही. केवळ भारतीय नागरिकच परमिट घेऊनच इथे येऊ शकतात.
Madhuri Lake Arunachal Pradesh
esakal
Nepal Taj Mahal Rani Mahal history
esakal