Yashwant Kshirsagar
जर तुम्ही नेपाळला भेट देण्याचा प्लॅन करत असाल, तर फक्त काठमांडू किंवा पोखरा एवढ्यापुरते मर्यादित राहू नका. नेपाळच्या कुशीत लपलेले एक रोमँटिक ठिकाण आहे, जे तुमची ट्रीप अविस्मरणीय बनवेल.
Nepal Taj Mahal Rani Mahal history
esakal
नेपाळमध्येही एक ताजमहाल आहे! पाल्पा जिल्ह्यातील राणीघाट येथे उभा असलेला राणी महालला लोक "नेपाळचा ताजमहाल" म्हणतात. चार मजली हा राजवाडा अप्रतिम सौंदर्याने नटलेला आहे.
Nepal Taj Mahal Rani Mahal history
esakal
जंगलाने वेढलेला, समोरून काली गंडकी नदी वाहते आणि आजूबाजूच्या टेकड्यांचे विहंगम दृश्य असलेले हे ठिकाण खरोखरच जादुई आहे. निसर्ग आणि वास्तुकलेचा अपूर्व संगम येथे पाहायला मिळतो.
Nepal Taj Mahal Rani Mahal history
esakal
राणी महाल फक्त सुंदर नाही, तर प्रेमाचे प्रतीक आहे. जशा ताजमहालची कहाणी शाहजहाँ आणि मुमताजची आहे, तशीच हीही एक हृदयस्पर्शी प्रेमकथा आहे.
Nepal Taj Mahal Rani Mahal history
esakal
नेपाळचे जनरल खडग शमशेर राणा यांनी १८९३ मध्ये आपली प्रिय पत्नी तेज कुमारी देवी यांच्या स्मृतीत हा राजवाडा बांधला. प्रेमासाठी खर्च केलेली अफाट संपत्ती आजही लोकांना आकर्षित करते.
Nepal Taj Mahal Rani Mahal history
esakal
राणी महाल बांधण्यासाठी त्या काळात सुमारे ३५ कोटी नेपाळी रुपये खर्च झाले होते. ही रक्कम त्या वेळी प्रचंड मोठी मानली जात असे.
Nepal Taj Mahal Rani Mahal history
esakal
काली गंडकी नदीकाठी सूर्योदय आणि सूर्यास्त पाहा.,राणी बन (राणीचे जंगल) मध्ये निसर्गात फिरा. श्रीनगर हिलवरून हिमालयाचे विहंगम दृश्य पहा.तानसेन बाजारात स्मृतीचिन्हे खरेदी करू शकता.
Nepal Taj Mahal Rani Mahal history
esakal
सकाळी ९:०० ते सायंकाळी ५:०० (पर्यटकांच्या हंगामात वेळ वाढवली जाते) परदेशी पर्यटकांसाठी ५०० नेपाळी रुपये प्रवेश शुल्क आहे.
Nepal Taj Mahal Rani Mahal history
esakal
राणी महाल तानसेनपासून १३ किलोमीटर अंतरावर आहे. रस्त्याने सहज पोहोचता येते. साहसी लोकांसाठी तानसेनपासून २ ते ४ तासांचे ट्रेकिंग देखील उपलब्ध आहे.
Nepal Taj Mahal Rani Mahal history
esakal
Konkan Monsoon Travel
esakal