संतोष कानडे
प्रत्येकाच्या घरात मॅगी ही बनतेच. शिवाय घराबाहेर राहणाऱ्या मुलं-मुलींसाठी मॅगी म्हणजे मोठा आधार असतो. याच मॅगीचं नाव मॅगी कसं पडलं, ते पाहूया.
मॅगीचा शोध ज्युलियस मॅगी या स्वीस व्यक्तीने १८८४ साली स्वित्झर्लंडमध्ये लावला होता. म्हणजे याला १४२ वर्षे झाली.
स्वित्झर्लंडमध्ये त्याकाळी औद्योगिक क्रांती सुरु झाली होती. कामगारांना जेवण बनवण्यासाठी वेळ नसायचा.
कमी वेळा पौष्टीक जेवण मिळावे, या उद्देशाने ज्युलियस यांनी प्रथिनं असलेल्या पिठाचं सूप तयार केलं आणि त्यानंतर नूडल्सचा जन्म झाला.
नेस्ले कंपनीने १९४७ मध्ये मॅगी ब्रँड विकत घेतला. भातरामध्ये १९८३ मध्ये मॅगी आली. तेव्हा भारतात कुणी नूडल्स खात नव्हतं.
नेस्लेने मॅगीला २ मिनिटात नूडल्स असं म्हणत प्रोजेक्ट केलं. त्यामुळे हा खाद्यप्रकार सर्वांच्याच पसंतीस उतरला.
प्रत्येक देशातली मॅगी ही त्या-त्या देशातील लोकांच्या रुचीनुसार असते. २०१५ मध्ये भारतात मॅगीवर बंदी घातली होती.
चाचणीमध्ये मॅगीत शिसे आणि एमएसजीचं प्रमाण जास्त आढळून आल्याचा आरोप झालेला. त्यानंतर सर्व चाचण्या पास करुन मॅगीने पुन्हा बाजारात पुनरागमन केलं.
नेस्ले कंपनीसाठी भारत जी जगातली मॅगीसाठीची सर्वात मोठी बाजारपेठ झाली आहे. आतातर कोणत्याही ब्रँडच्या नूडल्सला मॅगी म्हटलं जाऊ लागलंय.